Dhagala Lagali : Dream Girl चं मराठी प्रमोशन साँग रिलीज, रितेश-आयुष्यमानचा धम्माल डान्स

Dhagala Lagali : Dream Girl चं मराठी प्रमोशन साँग रिलीज, रितेश-आयुष्यमानचा धम्माल डान्स

आतापर्यंत जवळापास सर्वच हिंदी सिनेमांचं प्रमोशन साँग हे पंजाबीमध्ये असतं. मात्र ड्रीम गर्लचं प्रमोशन साँग मराठीमध्ये आहे.

  • Share this:

मुंबई, 27 ऑगस्ट : अभिनेता आयुष्मान खुराना सध्या त्याच्या आगामी ड्रीम गर्ल सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. सिनेमाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची उत्सुकता तुफान वाढली. यानंतर सिनेमातील राधे राधे गाण्यावर थिरकल्यानंतर आयुष्मान पहिल्यांदा मराठी गाण्याच्या रीमिक्सवर नाचताना दिसणार आहे, तेही फक्त रितेश देशमुखच्या सांगण्यावरून.

ड्रीम गर्ल सिनेमासाठी दादा कोंडके यांच्या ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं या सुपरहिट गाण्याच्या रिमिक्सवर आयुष्मान आणि नुसरत थिरकताना दिसणार आहेत. आयुष्मान पहिल्यांदा मराठी गाण्यावर डान्स करणार आहे. हे गाणं नुकतंच रिलीज झालं. ज्याला प्रेक्षाकांचा चांगला प्रतिसाद मिळाताना दिसत आहे. तासाभरातच हे गाणं 70 हजाराहून जास्त लोकांनी पाहिलं आहे.

या गाण्याच्या व्हिडीओवर युजर्सच्या सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळात आहेत. एका युजरनं यावर दादा कोंडकेंची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका युजरनं रितेश आणि आयुष्यमान यंदाच्या गणेशोत्सवात धम्माल करणार असल्याचं म्हटलं आहे. आतापर्यंत जवळापास सर्वच हिंदी सिनेमांचं प्रमोशन साँग हे पंजाबीमध्ये असतं. मात्र ड्रीम गर्लचं प्रमोशन साँग मराठीमध्ये आहे. हे फक्त रितेश देशमुखच्या शब्दावर असल्याचं बोललं जात आहे.

VIDEO : मुलगा की मुलगी? बाळाच्या जन्माआधीच अ‍ॅमी जॅक्शननं केला खुलासा

Loading...

नेहमीच आगळ्या वेगळ्या भूमिका साकारल्यानं चर्चेत राहणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुष्मान खुराना ड्रीम गर्ल सिनेमात हटके भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीया सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता. ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच्यासोबत अभिनेत्री नुसरत भरूचा, अन्नू कपूर, विजय राज, मनजोत सिंह, निधी बिष्ट, राजेश शर्मा, अभिषेक बनर्जी आणि राज भन्साळी यांसारखे तगडे कलाकार दिसणार आहेत. राज शांडिल्य दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 13 सप्टेंबरला देशभरात प्रदर्शित होणार आहे.

सलमान खानची मागणी भन्साळींना नामंजूर, ‘इन्शाअल्लाह’मधून दबंगचं बॅकआउट?

बॅक फ्लिप स्टंट करताना पडली दिशा पटानी, VIDEO VIRAL

===================================================================

VIDEO : धावत्या रिक्षातून विद्यार्थी फेकला गेला बाहेर, तोच उठून पळाला मागे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 03:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...