'धडक' सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या डोळ्यात आणणार अश्रू

'धडक' सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या डोळ्यात आणणार अश्रू

उद्या शुक्रवारी 'धडक' रिलीज होतोय.जान्हवीने आपला धडक हा सिनेमा श्रीदेवीना समर्पित करण्याची इच्छा व्यक्त केली, सिनेमाच्या निर्मात्यांनी देखील त्यासाठी मान्यता दिली.

  • Share this:

मुंबई, 19 जुलै : उद्या शुक्रवारी 'धडक' रिलीज होतोय.जान्हवीने आपला धडक हा सिनेमा श्रीदेवीना समर्पित करण्याची इच्छा  व्यक्त केली, सिनेमाच्या निर्मात्यांनी देखील त्यासाठी मान्यता दिली.बॉलिवूड लाईफ या वेबसाईटच्या माहितीनुसार जान्हवीने आपल्या आईला एक हृदयस्पर्शी पत्र लिहिलंय. ते वाचून प्रेक्षकांच्या डोळ्यात नक्की अश्रू येतील. ते पत्र सिनेमाच्या सुरुवातीला दाखवलं जाईल. सोबत श्रीदेवीचा फोटोही असेल.

बॉलिवूड अभिनेत्री आणि जान्हवीची आई श्रीदेवी यांना जान्हवीच्या धडक सिनेमाबाबत खूपच उत्सुक होती.  त्यासाठी जान्हवीकडून तयारी सुद्धा करून घेत होत्या, खरं तर जान्हवीने सिनेसृष्टीत करियर बनवू नये असं श्रीदेवींचं सुरुवातीला मत होतं. परंतु  जान्हवीने बॉलिवूड हे ऑप्शन निवडलं तेव्हा श्रीदेवींनी तिच्या निर्णयाचं स्वागत केलं आणि त्यासाठी ब्युटी टिप्सपासून अभिनयातील नजाकतींची सुद्धा तयारी तिच्याकडून करून घेतली.

हेही वाचा

जिममध्ये व्यायाम करताना या 6 गोष्टी चुकूनही विसरू नका

भिजवलेले बदाम खा आणि निरोगी रहा

पैशांची गुंतवणूक करताय? मग या 10 वाईट सवयी टाळा

धडकच्या शूटिंगच्या सुरुवातीला अनेकदा श्रीदेवी तिच्या सोबत शूटवर जायच्या आणि घरच्या फावल्या वेळात तिच्याकडून अभिनयाचे धडे गिरवून घ्यायच्या. जान्हवीचं बॉलिवूडमधील पदार्पण आणि धडकचं बॉक्स ऑफिसवरील यश पाहण्यासाठी त्या खूप उत्सुक होत्या. परंतु नियतीच्या मनात वेगळंच होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2018 10:45 AM IST

ताज्या बातम्या