'बेहद' फेम अभिनेता पियूष सहदेवला बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक

'बेहद' फेम अभिनेता पियूष सहदेवला बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक

सोनी टीव्ही वाहिनीवर लोकप्रिय 'बेहद' मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता पियूष सहदेवला बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलीये.

  • Share this:

24 नोव्हेंबर : सोनी टीव्ही वाहिनीवर लोकप्रिय 'बेहद' मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता पियूष सहदेवला बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलीये.

पियूष आणि त्यांची पत्नी गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहत आहे. त्याच्या पत्नीने पियूषच्या विरोधात अत्याचाराची तक्रार दाखल केलीये. तेव्हा पासून पियूष आणि त्याची पत्नी वेगळे झाले होते.

आज एका सह अभिनेत्रीने पियूषवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केलाय. या आरोपानंतर पियुषला वर्सोवामधून पोलिसांनी अटक केलीये. याआधी पियूषला 22 नोव्हेंबरला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. चौकशीअंती त्याला अटक करण्यात आलीये. पियूषने छोट्या पडद्यावर देवो के देव महादेव, गीत, मीत मिला दे रब्बा आणि बेहद मालिकेत काम केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2017 09:33 PM IST

ताज्या बातम्या