Home /News /entertainment /

‘देवों के देव महादेव’च्या पार्वतीचा बोल्ड अवतार, चाहत्यांचा संताप

‘देवों के देव महादेव’च्या पार्वतीचा बोल्ड अवतार, चाहत्यांचा संताप

‘टीव्हीवरील लोकप्रिय शो 'देवों के देव महादेव' मध्ये पार्वतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जी (Puja Banerjee Bold Photos) सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

  मुंबई, 22 जानेवारी- ‘टीव्हीवरील लोकप्रिय शो  'देवों के देव महादेव' मध्ये पार्वतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जी  (Puja Banerjee Bold Photos)  सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. पूजा छोट्या पडद्यावर भलेही साधीभोळी दिसत असेल परंतु खऱ्या आयुष्यात ती खूप बोल्ड आहे. अभिनयासोबतच पूजा सोशल मीडियावरही सक्रीय असते. ती नेहमी आपले खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यामधील तिच्या बोल्ड अदा चाहत्यांना घायाळ करत असतात. नुकतेच पूजा बॅनर्जी हिने सोशल मीडियावर हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. यामध्ये पूजा जाळीदार बिकीनी आणि बाथ टबसोबत दिसत आहे. पडद्यावर ‘पार्वती’ साकारणाऱ्या पूजाचा हा ऑफस्क्रीन बोल्ड अवतार पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. फोटोत पूजाने डीप नेक वनपीस परिधान केल्याचे दिसत आहे. तसेच तिने राउंड हॅट आणि निळ्या रंगाचा चष्मा घातला आहे. आपल्या केसांना बाजूला करत ती फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. पूजाच्या या फोटोवार चाहत्यांना कमेंटचा वर्षाव केला आहे. काहीजण तर पूजाच्या या अदांवर फिदा झाल्याचे दिसत आहेत. तर एकाने नाराजी व्यक्त करत लिहले आहे की, ‘ओ तेरी...|’
  पूजा बॅनर्जीने काही दिवसापूर्वी इन्साटवर एक बोल्ड फोटो शेअर केला  होता. या फोटोत ती पॅरेट ग्रीन मोनोकोनी घालून तिची फिगर फ्लॉन्ट करताना दिसली होती. हा फोटो शेअर करत तिनं म्हटलं होते की, प्रेमाच्या रंगात.. तिचा हा फोटो लाखो चाहत्यांनी लाईक केला होता. हॉटी, किलर व फायर इमोजी पोस्ट करत पूजाच्या या लुकची प्रशंसा करत होते. पूजाचा हा फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला होता.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, TV serials

  पुढील बातम्या