Home /News /entertainment /

गोपी बहु संस्कार विसरली का? बेली डान्समुळं देवोलिना होतेय ट्रोल

गोपी बहु संस्कार विसरली का? बेली डान्समुळं देवोलिना होतेय ट्रोल

या व्हिडीओमध्ये मादक अंदाजात बेली डान्स करताना दिसत होती. मात्र तिचा डान् पाहून काही प्रेक्षक संतापले अन् त्यांनी संस्कार विसरलीस का? गोपी बहु? असा सवाल करण्यास तिला सुरुवात केली.

  मुंबई 28 जून: साथ निभाना साथिया (Saath Nibhaana Saathiya) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) आज छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मालिकेत संस्कारी सुनेच्या भूमिकेत झळकणारी देवोलिया खऱ्या आयुष्यात मात्र तितकीच बोल्ड आहे. अनेकदा या बोल्डनेसचं प्रदर्शन ती सोशल मीडियावर देखील करताना दिसते. यावेळी देखील तिनं असाच एक ग्लॅमरस व्हिडीओ शेअर केला होता. (Devoleena Bhattacharjee belly dance) या व्हिडीओमध्ये मादक अंदाजात बेली डान्स करताना दिसत होती. मात्र तिचा डान् पाहून काही प्रेक्षक संतापले अन् त्यांनी संस्कार विसरलीस का? गोपी बहु? असा सवाल करण्यास तिला सुरुवात केली.
  इगतपुरी रेव्ह पार्टीत अटक झालेली हिना पांचाळ नेमकी कोण आहे?, जाणून घ्या देवोलिना सध्या डान्सर होण्याचा प्रयत्न करतेय. यासाठी ती नृत्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेत आहे. दरम्यान नृत्यशाळेत शिकलेल्या गोष्टी अनेकदा ती आपल्या चाहत्यांसमोर सादर करताना दिसते. यावेळी तिनं बेली डान्स करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला. सोबतच पाहा मी बेली डान्सचा असा सराव करतेय अशा आशयाची एक कमेंट देखील केली. मात्र तिचा हा मादक डान्स काही नेटकऱ्यांना आवडलेला नाही. अन् त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. गोपी बहु आपले संस्कार विसरलेली दिसतेय अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत तिची खिल्ली उडवली जात आहे. लैंगिक गैरवर्तणुकीला वैतागुन अभिनेत्रीनं सोडला चित्रपट; निर्मात्यांवर केले गंभीर आरोप यापुर्वी देवोलिना कंगना रणौतला खडेबोल सुनावल्यामुळं चर्चेत होती. “कंगनानं वायफळ बडबड थांबवावी अन् स्वत: घराबाहेर पडून लोकांना मदत करावी. ऑक्सिजन कुठे मिळतंय, लस मिळवण्यासाठी कुठे आणि कसं रजिस्ट्रेशन करावं, कुठल्या रुग्णालयात उपचारासाठी बेड उपलब्ध आहेत. यांसारखी कित्येक काम ती पैसे खर्च केल्याशिवाय देखील करु शकते. इतर सेलिब्रिटी आपापल्या परीनं मदत करत आहेत. ही नुसती लोकांना फुकटचे सल्ले देतेय अन् टीका करतेय.” अशी टीका तिनं नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत केली होती.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Dance video, Entertainment, Tv actress

  पुढील बातम्या