Home /News /entertainment /

'Bigg Boss 15' च्या घरातून बाहेर पडताच रुग्णालयात दाखल झाली देवोलिना, नेमकं काय घडलं

'Bigg Boss 15' च्या घरातून बाहेर पडताच रुग्णालयात दाखल झाली देवोलिना, नेमकं काय घडलं

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या डबल एव्हिक्शननंतर 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) मधून बाहेर पडली.

    मुंबई, 28 जानेवारी-   छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी   (Devoleena Bhattacharjee)  या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या डबल एव्हिक्शननंतर 'बिग बॉस 15'   (Bigg Boss 15)  मधून बाहेर पडली. परंतु शोमधून बाहेर पडताच देवोच्या अडचणी वाढल्या आहेत. देवोलिना भट्टाचार्जीला एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. यासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिची मैत्रिण लक्ष्मी अय्यरने तिचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हॉस्पिटलच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. चांगली गोष्ट ही आहे की देवोलिनाच्या चेहऱ्यावर स्माईल आहे. देवोलीनाची मैत्रिण लक्ष्मीने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'मी फायटर गर्ल देवोलीनाला भेटले आणि शस्त्रक्रियेसाठी तिला दिलासा दिला. मी देवोवर खूप प्रेम करते. मला तुला हसताना पाहून खूप आनंद झाला आहे.’ असं म्हणत लक्ष्मीने देवोलिनावर आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. देवोलीना भट्टाचार्जी 'बिग बॉस 15' मध्ये एका टास्कदरम्यान गंभीर जखमी झाली होती. परंतु आता तिची दुखापत इतकी वाढली आहे की तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर देवोलिना भट्टाचार्जीने लाईव्ह सेशनमध्ये ही माहिती शेअर केली होती. त्यावेळी तिने सांगितलं होतं की, पोल टास्क करत असताना ती गंभीर जखमी झाली होती आणि तिच्या धमनीला इजा झाली होती. हे तिच्या चाहत्यांना सांगताना देवोलिना भावूकसुद्धा झाली होती. यावेळी बोलताना देवोलिना म्हणाली, 'माझा एमआरआय करण्यात आला आहे. माझी प्रकृती खूप गंभीर आहे. 19 तास फारच कठीण होते. घसरल्यामुळे जास्त दुखापत झाली आहे. मला गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून शुक्रवारी माझ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. मी या गोष्टीशी नक्कीच लढा देईन. परंतु मी चिंतेत आहे. मला फक्त तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी मला तुमच्याशी बोलायचे होते'.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bigg boss, Entertainment, Tv actress

    पुढील बातम्या