Home /News /entertainment /

एसीपी दिव्या पडली बज्याच्या प्रेमात?; पाहा ‘देवमाणूस’मधील कलाकारांचा अनोखा रोमान्स

एसीपी दिव्या पडली बज्याच्या प्रेमात?; पाहा ‘देवमाणूस’मधील कलाकारांचा अनोखा रोमान्स

देवमाणूस मालिकेच्या पडद्यामागे कलाकार धम्माल करताना दिसत आहेत. दिव्या बज्याच्या रोमॅन्टीक व्हिडीओने तर धूमाकुळ घातला आहे.

  मुंबई, 14 एप्रिल : झी मराठी (zee Marathi) वाहिनी वरील लोकप्रिय ठरत असलेली मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus)  सध्या भलतीच चर्चेत आहे. मालिकेत पात्रांची जेव्हढी धम्माल सुरू असते तेव्हढीच पडद्यामागे ही सुरूच असते. काहीच दिवसांपूर्वी मालिकेतील बज्या आणि दिव्याचा एक व्हिडीओ फारच व्हायरल झाला होता. बज्या आणि दिव्याने एक रोमॅन्टीक व्हिडीओ शुट केला होता. तर ‘डॉक्टरचं आता काय होणार’ अशा भन्नाट कमेंट्स यानंतर पाहायला मिळाल्या. आता दिव्या म्हणजेच अभिनेत्री नेहा खानचा (Neha Khan) आणि मायरा म्हणजेच चार्वी खडसेचा (charvi khadse) एक व्हिडीओ चर्चेत येत आहेत. या शिवाय इतरही कलाकार नेहमीच विविध व्हिडीओ बनवून धम्माल करताना दिसतात.
  दिव्या म्हणजेच अभिनेत्री नेहा खान आणि मायरा तिने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत मस्ती करताना दिसत आहेत. याशिवाय अनेक मजेशीर रिल्स व्हिडीओस ते सेट वर बनतात.  वाथी कमिंग या फेमस ट्रेंड वरही सगळेच कलाकार थिरकताना दिसले होते. तर मालिकेचे चाहते त्यांना भरभरून कमेंट्स आणि लाइक्स ही देत असतात.
  मालिकेचे चित्रिकरण हे सातारा जिल्ह्यात सुरू आहे. तेव्हा शुटींग व्यतिरिक्त वेळात मालिकेतील डिम्पल, डॉक्टर, दिव्या, मायरा, टोण्या, बज्या हे एकमेकांसोबत धम्माल करताना दिसतात. मालिकेतीस सरू आजी तिच्या शिव्यांमुळे भलतीच हिट ठरत आहे. तिच्या वेगळ्या थाटनिच्या शिव्या देखिल प्रेश्रकांनी स्वीकारल्या आहेत.
  देवमाणूस मालिका आता वेगळ्या वळणावर आली आहे. दिव्या देवी सिंगचा कसून शोध घेत आहे. पण डॉक्टर मात्र वेळोवेळी तिला चकवा देत आहे.

  'बिग बॉस 13' फेम आरती सिंग समुद्रकिनारी झाली TOPLESS; फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ

  तर त्याने दिव्याला प्रेमाच्या जाळ्यातही ओढलय. तर दिव्याने देवी सिंगची केस सोडावी यासाठी त्याने आता त्याने चक्क मायराचं अपहरण केलं आहे. तेव्हा आता दिव्या पुढे नक्की काय करणार केस सोडणार की देवी सिंगचा शोध लावणार हे पाहणं औत्युक्याचं ठरेल.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या