Home /News /entertainment /

Video : 'देवमाणूस' मालिका निर्णायक वळणावर असतानाच जामकरांच्या डान्सनं वेधलं लक्ष, चक्क आंतरराष्ट्रीय पातळीवर परफॉर्मन्सची घेतली दखल!

Video : 'देवमाणूस' मालिका निर्णायक वळणावर असतानाच जामकरांच्या डान्सनं वेधलं लक्ष, चक्क आंतरराष्ट्रीय पातळीवर परफॉर्मन्सची घेतली दखल!

सध्या मार्तंड जामकरांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियवर प्रचंड व्हायरल होत आहे. मार्तंडच्या या डान्स व्हिडिओचे विविध गाण्यावरचे रील्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

  मुंबई, 10 मे- देवमाणूस ( devmanus) मालिकेच्या पहिल्या सिझनला जितका चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला तितका देवमाणूस सीझन 2 ( devmanus 2) ला प्रतिसाद मिळत नाही. मात्र मागच्या काही दिवसापूर्वी मालिकेत अभिनेते मिलिंद शिंदे यांची एंट्री झाली आहे. यामुळे देवमाणूस मालिकेच दररोज नवीन ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. मिलिंद शिंदे यांच्या भूमिकेमुळे मालिका आधिक रंजक झाली आहे. मिलिंद शिंदे ( milind shinde) मालिकेत मार्तंड जामकरची भूमिका (milind shinde dance video) साकारताना दिसत आहेत. डॉक्टरची सततची कटकारस्थाने पाहून प्रेक्षक कंटाळले आहेत. मात्र आता मार्तंड जामकर डॉक्टरला चांगलाच त्रास देताना दिसत आहे. त्यामुळे सध्या तरी मार्तंड जामकरवरच्या एंट्रीमुळे प्रेक्षक आनंदात आहेत. सध्या मार्तंड जामकरांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियवर प्रचंड व्हायरल होत आहे. मार्तंडच्या या डान्स व्हिडिओचे विविध गाण्यावरचे रील्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यांचा हा डान्स व्हिडिओ इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे की, त्यांच्या परफॉर्मन्सची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. विश्वास बसत नसेल तर हा व्हायरल व्हिड़िओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. वाचा-'बॉलिवूडला मी परवडणार नाही..', साऊथ स्टार महेश बाबूचं वक्तव्य चर्चेत डान्सचा सीन नेमका आहे तरी काय? मार्तंडने डिंपलला चौकशीसाठी बोलावलेले असते. आपल्या देवमाणसाला हा मार्तंड त्रास देतोय हे गावकऱ्यांना पटत नसते. म्हणूनच हे प्रायश्चित्त करण्यासाठी जामकर वाड्यात येऊन डॉक्टरची माफी मागतो आणि आपल्या घरी जेवायला बोलावतो. साग्रसंगीत जेवण केलं आहे जेवण समोर मांडून तो साग्र झालं आता संगीत हवं असे म्हणून जामकर डान्स करायला लागतो. ‘कंगणी कंगणी’ त्याचा हा डान्स पाहून डिंपल आणो डॉक्टरला मात्र घाम फुटतो. आपल्याला मॅडमनी भेटायला बोलावलं असतानाच जमकरचा हा पाहुणचार मात्र या दोघांनाही महागात पडणार असेच चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे.
  या सगळ्यात सोशल मीडियावर मात्र जामकरांच्या डान्सनं धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षत जामकरांवर जाम खूश आहेत. त्यांचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. त्यांच्या डान्स व्हिडिओवर विविध फनी रील्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
  हळूहळू डॉक्टर आणि डिंपल मार्तंडच्या जाळ्यात ओढली जात असल्याचे पाहून प्रेक्षक मार्तंडवर भलतेच खुश झालेले आहेत. अशातच मार्तंडचा डान्स डिंपल आणि डॉक्टरला धडकी भरायला लावणारा आहे. त्यामुळे आता मालिका निर्णायक वळणावर येऊन ठेपली असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. मात्र या सगळ्यात मार्तंड जामकरांच्या डान्सनं मालिकेच पुन्हा जीव तर आणला आहेच पण सोशल मीडियावर सध्या या डान्सची चर्चा आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या