VIDEO: देवमाणूस...अखेर आर्यादेखील अडकली डॉक्टरच्या जाळ्यात?

‘देवमाणूस’(Devmanus) मालिकेने प्रेक्षकांवर अक्षरशः गारुड घातलं आहे.

‘देवमाणूस’(Devmanus) मालिकेने प्रेक्षकांवर अक्षरशः गारुड घातलं आहे.

  • Share this:
    मुंबई, 23 जून-  ‘देवमाणूस’(Devmanus)  मालिकेने प्रेक्षकांवर अक्षरशः गारुड घातलं आहे. मालिकेत दररोज येणाऱ्या नवनवीन ट्वीस्टने चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे. या मालिकेत अजित कुमार देव उर्फ देवीसिंग(Devisingh) म्हणजेच डॉक्टरने अनेक निष्पाप महिलांचा बळी घेतला आहे. आणि आत्ता तो यासर्व गुन्ह्यांसाठी कोर्टात उभा आहे. त्याचे हे गुन्हे सर्वांसमोर आणून त्याला शिक्षा देण्यासाठी मालिकेत एका सरकारी महिला वकीलची एन्ट्री झाली आहे. या वकीलचं नाव आर्या (Aarya) असं आहे. मात्र आत्ता आर्यासुद्धा डॉक्टरच्या जाळ्यात अडकल्याचं म्हटलं जात आहे. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण.
    झी मराठीवरील ‘देवमाणूस’ मालिका प्रेक्षकांची खुपचं आवडती मालिका बनली आहे. मालिकेत दररोज येणारे नवे ट्वीस्ट प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत असतात.या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. डॉक्टर,आजीपासून ते आत्ता नव्याने आलेल्या आर्यापर्यंत. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये आर्या आणि डॉक्टरसोबत दिसत आहेत. त्यामुळे आर्यासुद्धा डॉक्टरच्या जाळ्यात अडकल्याचं म्हटलं जात आहे. (हे वाचा:'पाठक बाईचा' रावडी अंदाज; अक्षयाचा भन्नाट VIDEO होतोय VIRAL  ) मात्र हा व्हिडीओ आर्या म्हणजेच सोनाली पाटील आणि डॉक्टर म्हणजेच किरण गायकवाड यांनी ऑफस्क्रीन धम्माल म्हणून केला आहे. या दोघांनी सेटवर मजामस्ती करत असताना हा व्हिडीओ बनवला आहे. यामध्ये आर्याच्या चेहऱ्यावर एक लाजरं हास्य आहे. ती पुढे जात आहे तर डॉक्टरच्या मागे मागे येत आहे. आणि पाठीमागे ‘देवमाणूस’ चं संगीतसुद्धा वाजत आहे. असा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना असंचं वाटत आहे, की हा मालिकेतील एक भाग आहे. आणि आर्या डॉक्टरच्या जाळ्यात अडकली आहे. मात्र असं नाहीय हा व्हिडीओ कलाकारांच्या ऑफस्क्रीन धम्मालचा आहे. सध्या तरी आर्या डॉक्टरच्या जाळ्यात आलेली नाहीय. मात्र पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं आहे.
    Published by:Aiman Desai
    First published: