मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘आमचा नाद लय बाद’; ‘देवमाणसा’ला घाबरवणाऱ्या चंदीवर होतोय कौतुकाचा वर्षाव

‘आमचा नाद लय बाद’; ‘देवमाणसा’ला घाबरवणाऱ्या चंदीवर होतोय कौतुकाचा वर्षाव

चंदी ही व्यक्तिरेखा अभिनेत्री माधुरी पवार (Madhuri Pawar) साकारत आहे. ग्लॅमरस अदांसाठी प्रसिद्ध असलेल्या माधुरीचा हा गावरान अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे.

चंदी ही व्यक्तिरेखा अभिनेत्री माधुरी पवार (Madhuri Pawar) साकारत आहे. ग्लॅमरस अदांसाठी प्रसिद्ध असलेल्या माधुरीचा हा गावरान अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे.

चंदी ही व्यक्तिरेखा अभिनेत्री माधुरी पवार (Madhuri Pawar) साकारत आहे. ग्लॅमरस अदांसाठी प्रसिद्ध असलेल्या माधुरीचा हा गावरान अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे.

मुंबई 21 जुलै: देवमाणूस (Devmanus) ही मालिका छोट्या पडद्यावर अक्षरश: धुमाकूळ घालताना दिसतेय. एकामागून एक येणारे ट्विस्ट आणि सर्वच कलाकारांचा जबरदस्त अभिनय यामुळे देवमाणूस ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. (Devmanus TV Serial) दरम्यान या मालिकेत आता आणखी एक नवं वळण आलं आहे. यामध्ये चंदी (Chandi) नामक एका तरुणीची एण्ट्री झाली आहे. विशेष म्हणजे आल्याआल्याच तिने खलनायक देवी सिंगला आव्हान दिलं आहे. तिचा हा अंदाच प्रेक्षकांना आवडला असून तिच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

राज कुंद्रा कसा करायचा Pornography बिझनेस? कमवायचा बक्कळ पैसे

चंदी ही व्यक्तिरेखा अभिनेत्री माधुरी पवार (Madhuri Pawar) साकारत आहे. ग्लॅमरस अदांसाठी प्रसिद्ध असलेल्या माधुरीचा हा गावरान अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. “चंदा कुणाचीच उधारी बाकी ठेवत नाही. सगळं वसुल करते व्याजा सकट” असं म्हणत तिने देवमाणूसमध्ये एक नवा ट्विट्स आणला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे तिची एण्ट्री पाहून खलनायक देवी सिंग देखील भेदरला आहे. त्याला स्वप्नात देखील चंदाच दिसतेय. नुकताच झी मराठी वाहिनीने आगामी भागाचा प्रोमो रिलिज केला. या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “नाद करायचा नाय, आमच्या ताई साहेबांचा” अशा प्रतिक्रिया देत चाहत्यांनी चंदावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

‘तर मी देखील तुरुंगात असते’; राज कुंद्रानं या अभिनेत्रीला दिली होती Pornographyची ऑफर

View this post on Instagram

A post shared by (@madhuripawarofficial)

‘देवमाणूस’ ही मालिका साताऱ्यात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. या ठिकाणी अगदी मालिकेत दाखवल्याप्रमाणेच एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीनं डॉक्टराचं सोंग पांघरुन 13 वर्षात तब्बल सात स्त्रियांना फसवलं. या गुन्हेगाराला देखील पोलिसांनी अशाच प्रकारे पकडलं होतं. या पार्श्वभूमीवर ‘देवमाणूस’ मालिकेचा शेवटही असाच होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेतील ‘सरू आजी, डिम्पल, टोण्या, बज्या, विजय,नाम्या, मंजुळा आणि डॉ. अजित कुमार देव’ ही आणि अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत. रंजक आणि रहस्यमयी कथानकामुळं ही मालिका लोकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रत्येक एपिसोडगणिक मालिकेची उत्कंठा वाढत आहे. येत्या काळात मालिका आणखी रंगत जाणार यात शंका नाही. ‘देवमाणूस’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Tv serial, Video viral, Zee marathi serial