• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'देवमाणूस'...डॉक्टरचा गणपती डान्स; VIDEO पाहून तुम्हीही थिरकाल

'देवमाणूस'...डॉक्टरचा गणपती डान्स; VIDEO पाहून तुम्हीही थिरकाल

‘देवमाणूस’ (Devmanus) मालिकेने चाहत्यांवर चांगलचं गारुड घातलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 14 जुलै- ‘देवमाणूस’ (Devmanus) मालिकेने चाहत्यांवर चांगलचं गारुड घातलं आहे. यातील कलाकारांनी सुद्धा आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावलं आहे. हे कलाकारसुद्धा फक्त मालिकाचं नव्हे तर सोशल मीडियाच्या माध्यमातूनसुद्धा चाहत्यांच्या संपर्कात असतात. मालिकेतील डॉक्टर म्हणजेच अभिनेता किरण गायकवाडने (Kiran Gaikwad) नुकाताचं एक डान्सचा मजेशीर व्हिडीओ शेयर (Share Video) केला आहे. याला कॅप्शन देत त्याने गणपती डान्स असं म्हटलं आहे.
  झी मराठीवरील ‘देवमाणूस’ ही मालिका खुपचं पसंत केली जात आहे. मालिकेत दररोज येणारी रहस्ये आणि कलाकरांचा अस्सल अभिनय यामुळे चाहते अगदी खिळून राहिले आहेत. मालिकेतील कलाकारसुद्धा खुपचं लोकप्रिय झाले आहेत. हे कलाकार सोशल मीडियावरसुद्धा खुपचं सक्रीय असतात. मालिकेतील डॉक्टर अर्थातच अभिनेता किरण गायकवाडसुद्धा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. तो सतत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही ना काही शेयर करून चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. (हे वाचा: 'पवित्र रिश्ता 2' मुळे ट्रोल झाली अंकिता; सुशांतच्या चाहत्यांची बायकॉटची मागणी ) नुकताच अभिनेता किरण गायकवाडने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक रील शेयर केला आहे. हा एक डान्स व्हिडीओ आहे. यामध्ये किरण अगदी मजेशीर डान्स करत असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत किरणने गणपती डान्स म्हटलं आहे. कारण आपल्याला माहितीचं आहे. गणेशोत्सवात आपली तरुण मंडळी कशी नाचत असतात. स्टेप काही असो फक्त आणि फक्त डान्स एन्जॉय करत असतात. असाच हा मजेशीर डान्स व्हिडीओ आहे. चाहते किरणचा हा व्हिडीओ पसंत करत आहेत. तसेच त्याला मजेशीर कमेंट्ससुद्धा करत आहेत. या व्हिडीओमध्ये किरण ‘मला सोडून गेली गो’ या गाण्यावर धम्माल करताना दिसत आहे. (हे वाचा:राजकीय नाटकं चालतात पण आमची नाही’; केदार शिंदेंचा राज्य सरकारला टोला) सध्या मालिकेमध्ये खुपचं इंटरेस्टींग भाग सुरु आहे. दिव्या आणि आर्या जितके पुरावे कोर्टात सादर केले त्या सर्वांना डॉक्टरने आपल्या धूर्त बुद्धीने चुकीचं ठरवलं आहे. आत्ता तर जजनी त्याला निर्दोषसुद्धा जाहीर केलं आहे. मात्र एका स्त्रीच्या येण्याने डॉक्टरची चक्क शुद्धचं हरपते. आत्ता मालिकेत हे कोणत नवं वळण आहे यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. डॉक्टर खरंच सुटणार की त्या स्त्रीच्या येण्याने त्याला फाशी मिळणार याकडे दर्शकांचं लक्ष लागलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: