Home /News /entertainment /

'देवमाणूस' फेम किरण गायकवाडने सोशल मीडियाला केलं रामराम; शेवटची पोस्ट होतेय VIRAL

'देवमाणूस' फेम किरण गायकवाडने सोशल मीडियाला केलं रामराम; शेवटची पोस्ट होतेय VIRAL

Kiran Gaikwad Instagram: 'देवमाणूस' मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचणारा डॉक्टर अजितकुमार देव म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) प्रेक्षकांचा प्रचंड लाडका झाला आहे.म्हणूनच चाहते त्याच्याबाबत अपडेट्स जाणून घ्यायला सतत उत्सुक असतात. परंतु ही बातमी त्याच्या चाहत्यांना निराश करू शकते.

पुढे वाचा ...
  मुंबई, 15 जून-   सध्या मराठी मालिका   (Marathi Serials)  प्रचंड गाजत आहेत. त्यामुळेच या मालिकांचे सिक्वेल्ससुद्धा पाहायला मिळत आहेत. असंच काहीसं 'देवमाणूस'   (Devmanus)  या थरारक मालिकेच्या बाबतीत झालं होतं. या मालिकेने तुफान लोकप्रियता मिळवली होती. मालिकेचं प्रचंड यश आणि प्रेक्षकांची मागणी यामुळे मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मालिकेतील कलाकरांनासुद्धा प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. 'देवमाणूस' मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचणारा डॉक्टर अजितकुमार देव म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) प्रेक्षकांचा प्रचंड लाडका झाला आहे.म्हणूनच चाहते त्याच्याबाबत अपडेट्स जाणून घ्यायला सतत उत्सुक असतात. परंतु ही बातमी त्याच्या चाहत्यांना निराश करू शकते. 'देवमाणूस' या मालिकेत किरणची भूमिका जरी नकारात्मक असली तरी प्रेक्षक मात्र किरणवर भरभरून प्रेम करत आहेत. यापूर्वी किरणने साकारलेल्या 'लागीरं झालं जी' मालिकेतील भैय्यासाहेब या पात्रालासुद्धा प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं होतं. या मालिकेतील त्याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होत.किरण गायकवाड सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असतो.तो सतत नवनवीन व्हिडीओ आणि फोटो शेअर करुन चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. चाहतेही त्याच्या पोस्टला प्रचंड प्रतिसाद देत असतात.मात्र आता किरण चाहत्यांना सोशल मीडियावर दिसणार नाही.
  किरण गायकवाडने काही वेळेपूर्वी आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून त्याचे चाहते काहीशे निराश झाले आहेत. कारण अभिनेत्याने पोस्ट शेअर करत लिहिलंय, ''काही काळासाठी इन्स्टाग्राम बंद,#भेटू लवकरच''. असं लिहून चाहत्यांना चकित केलं आहे. अभिनेत्याने हा निर्णय का घेतला याबद्दल त्याने काहीही लिहिलेलं नाहीय. मात्र भेटू लवकरच या वाक्यामुळे चाहत्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. याचाच अर्थ किरण लवकरच आपल्याला इन्स्टाग्रामवर चाहत्यांचा मनोरंजन करताना दिसून येणार आहे. (हे वाचा:'मोठा नको होऊ...'; मृण्मयी देशपांडेने सिद्धार्थ चांदेकरच्या बर्थडेला शेअर केला भन्नाट PHOTO ) किरण गायकवाडने सहाय्यक अभिनेता ते मुख्य कलाकार असा कठीण प्रवास पार केला आहे. किरण गायकवाडने 2017 साली ‘लागीर झालं जी’ या मालिकेत भैयासाहेबची भूमिका साकारली होती. त्यानंतर 2020 मध्ये देवमाणूस मालिकेत किरणला अजितकुमार देवची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेतील त्याची नकारात्मक भूमिका तुफान गाजली आता या मालिकेचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीजनला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Instagram, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या