मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'देवमाणूस',डॉक्टर आणि डिंपलचा कॉमेडी अंदाज; VIDEO पाहून तुम्हालाही येईल हसू

'देवमाणूस',डॉक्टर आणि डिंपलचा कॉमेडी अंदाज; VIDEO पाहून तुम्हालाही येईल हसू

झी मराठीवर ‘देवमाणूस’ ही सत्य घटनेवर आधारित मालिका प्रसारित होते. या रहस्यमयी आणि थरारक मालिकेने चाहत्यांना अक्षरशः खिळवून ठेवलं आहे.

झी मराठीवर ‘देवमाणूस’ ही सत्य घटनेवर आधारित मालिका प्रसारित होते. या रहस्यमयी आणि थरारक मालिकेने चाहत्यांना अक्षरशः खिळवून ठेवलं आहे.

झी मराठीवर ‘देवमाणूस’ ही सत्य घटनेवर आधारित मालिका प्रसारित होते. या रहस्यमयी आणि थरारक मालिकेने चाहत्यांना अक्षरशः खिळवून ठेवलं आहे.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 29 जुलै- ‘देवमाणूस’ (Devmanus) मालिकेने बघता बघता चाहत्यांच्या मनावर गारुड घातलं आहे. मालिकेला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. त्याचबरोबर मालिकेतील कलाकारांनासुद्धा प्रसिद्धी मिळाली आहे. खासकरून डॉक्टर आणि डिंपल. तसं पाहायला गेलं तर मालिकेतील सर्वचं कलाकरांना एक नवी ओळख मिळाली आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचं चाहत्यांकडून कौतुक होतं असतं. हे कलाकार सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रीय असतात. नुकताच डॉक्टर (Doctor) आणि डिंपलचा (Dimpal)एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल(Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल.
झी मराठीवर ‘देवमाणूस’ ही सत्य घटनेवर आधारित मालिका प्रसारित होते. या रहस्यमयी आणि थरारक मालिकेने चाहत्यांना अक्षरशः खिळवून ठेवलं आहे. मालिकेत मुख्य कलाकार नकारात्मक भूमिकेत असले तरी, त्यांच्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. त्यामुळेच डॉक्टर आणि डिंपलची नकारात्मक भूमिकासुद्धा चाहत्यांनी डोक्यावर घेतली आहे. डॉक्टर म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड आणि डिंपल म्हणजे अभिनेत्री अस्मिता देशमुख या दोघांनी ही भूमिका साकारली आहे. (हे वाचा: तब्बल 2 वर्षांपासून शाकाहारी आहे श्रद्धा कपूर; अभिनेत्रीनं सांगितलं खास कारण) हे दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. सतत हे कलाकार आपल्या पोस्ट शेयर करून चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. तसेच या कलाकरांची ऑफस्क्रीम मस्तीसुद्धा मोठ्या प्रमाणात चालू असते. नुकताच किरणने म्हणजेच डॉक्टरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. हा व्हिडीओ एक मजेशीर इन्स्टाग्राम रील आहे. डॉक्टर आणि डिंपलने सोशल मीडियावरील प्रसिद्ध ‘डायलॉग छ्पो’ या व्हिडीओवर रील बनवला आहे. चाहत्यांना या दोघांचा हा मजेशीर अंदाज फारचं पसंत पडत आहे. चाहते मोठ्या प्रमणात या दोघांच्या व्हिडीओला पसंत करत आहेत. तसेच मजेशीर कमेंट्ससुद्धा करत आहेत. (हे वाचा: 'बसपन का प्यार' गाण्याने उडवली अनुष्का शर्माची झोप; पोस्ट शेयर करत म्हणाली...) सध्या  ‘देवमाणूस’ ही मालिका शेवटच्या टप्प्यावर आहे. लवकरच डॉक्टरचं भिंग सर्व कुटुंबांसमोर आणि गावकऱ्यांसमोर येणार आहे. आणि यासोबतचं मालिका आपला निरोप घेणार आहे. सध्या मालिकेत चंदा डॉक्टरला जेरीस आणत आहे. तिचं डॉक्टरचं सत्य जगासमोर आणण्यास पोलिसांना मदत करेल असं दिसत आहे. चाहत्यांना या सर्वाची मोठी उत्सुकता लागली आहे.
First published:

Tags: Marathi entertainment, Zee marathi serial

पुढील बातम्या