Home /News /entertainment /

'देवमाणूस' च्या सेटवर साऊथ इंडियन फिवर; बज्या-टोन्याचा धम्माल डान्स VIRAL

'देवमाणूस' च्या सेटवर साऊथ इंडियन फिवर; बज्या-टोन्याचा धम्माल डान्स VIRAL

झी मराठीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेने दर्शकांच्या मनावर गारुड घातलं आहे.

  मुंबई, 4 जुलै-  ‘देवमाणूस’ (Devmanus) मालिकेला दर्शकांचं मोठं प्रेम मिळत आहे. तसेच मालिकेतील प्रत्येक कलाकारसुद्धा दर्शकांच्या पसंतीस उतरला आहे. मालिकेतील डॉक्टरपासून ते छोट्या टोन्यापर्यंत सर्वच व्यक्त्रीरेखा चाहत्यांना भुरळ पाडत आहेत. हे कलाकार मालिकेत जितके मजेशीर दाखवण्यात आले आहेत. तितकीच मजामस्ती ते सेटवरसुद्धा करत असतात. या कलाकारांची ऑफस्क्रीन मस्ती नेहमीच पाहायला मिळते. नुकताच मालिकेतील बज्या (Bajya) आणि टोन्याचा(Tonya) एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. यामध्ये दोघेही अगदी साउथ इंडियन स्टाईलमध्ये(South Indian Song) दिसत आहेत.
  झी मराठीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेने दर्शकांच्या मनावर गारुड घातलं आहे. मालिकेत दररोज येणाऱ्या ट्वीस्टने चाहते अगदी उत्सुक होतं आहेत. ही रहस्यमयी मालिका चाहत्यांना खुपचं पसंत पडत आहे. तसेच मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा खुपचं लोकप्रिय ठरत आहे. या मजेशीर व्यक्तिरेखा चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत. यातीलचं दोन व्यक्तीरेखा म्हणजे बज्या आणि टोन्या होय. (हे वाचा: 'हातात बंदुक आणि रक्ताने माखलेला शर्ट'; आदित्यची अवस्था पाहून थक्क झाले चाहते ) नुकताच सोशल मीडियावर या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये बज्या आणि टोन्या दोघांवर साउथ फिवर चढल्याचं दिसून येत आहे. हे दोघेही अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडेच्या प्रसिध्द ‘बुटा बोम्मा’ या गाण्यावर डान्स करत आहेत. दोघांच्याही डान्स स्टेप्स इतक्या सुंदर आहेत, की यावरूनचं हे दोघेही उत्तम डान्सर असल्याचं देखील दिसून येत आहे. (हे वाचा:VIDEO: 'खतरों के खिलाडी' मध्ये फुललं नवं नातं; वाचा 'त्या' जोडीबद्दल   ) मालिकेच्या सेटवर अशी ऑफस्क्रीन मस्ती दररोज सुरु असते. प्रत्येक कलाकार शुटींगच्या मोकळ्या वेळेत आपल्या डान्सचा छंद जोपासत असल्याचं दिसून येत आहे. ‘देवमाणूस’ कलाकारांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. आणि या कलाकारांना मोठ्या प्रमाणात चाहत्यांचं प्रेमदेखील मिळत असतं.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या