मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'मैं पानी पानी हो गई..' जॅकलिनच्या गाण्यावर ACP दिव्याचा हॉट अंदाज; हा डान्स VIDEO होतोय व्हायरल

'मैं पानी पानी हो गई..' जॅकलिनच्या गाण्यावर ACP दिव्याचा हॉट अंदाज; हा डान्स VIDEO होतोय व्हायरल

‘मैं पानी पानी हो गई’ (Mai pani pani ho gyi) या सुपरहिट गाण्यावर नेहाने डान्स केला आहे.

‘मैं पानी पानी हो गई’ (Mai pani pani ho gyi) या सुपरहिट गाण्यावर नेहाने डान्स केला आहे.

‘मैं पानी पानी हो गई’ (Mai pani pani ho gyi) या सुपरहिट गाण्यावर नेहाने डान्स केला आहे.

मुंबई 29 जुलै: अभिनेत्री नेहा खान (Neha Khan) सध्या फारच चर्चेत आहे. झी मराठी (Zee Marathi) वरील मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus)  मधून घराघरात पोहोचलेली एसीपी दिव्या सिंग (Divya Singh) म्हणजेच अभिनेत्री नेहा खान. नेहा अभिनयासोबतच एक उत्तम डान्सर देखील आहे हे फारच कमी लोक जाणतात. मालिकेत येण्यापूर्वी ‘युवा डान्सिंग क्वीन’ या कार्यक्रमात तिने भाग घेतला होता.

नेहा तिच्या सोशल मीडिया वर फारच सक्रिय असते. नेहमी निरनिराळे डान्स व्हिडिओ तसेच फोटोज ती शेअर करत असते. यावेळी तिने एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. (Neha Khan dance videos)

विवादित होतं राज-शिल्पाचं वैयक्तिक आयुष्य; दोघांमधील भांडणाबाबत शर्लिनचा मोठा खुलासा

‘मैं पानी पानी हो गई’ (Mai pani pani ho gyi) या सुपरहिट गाण्यावर तिने डान्स केला आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या हा गाण्यावर तिने सुपर डान्स केला आहे. त्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

नेहा सोशल मीडिया फारच सक्रिय असते. अनेकदा तिचे व्हिडिओ व्हायरल होतात. अनेक मजेशीर तसेच डान्स व्हिडिओ ती  शेअर करत असते. काही दिवांपूर्वीच तिने मालिकेतील मंगल म्हणजेच अभिनेत्री अंजली जोगळेकर आणि मालिकेतील वंदी आत्या म्हणजेच अभिनेत्री पुष्पा चौधरी यांच्यासोबत डान्स व्हिडिओ शेअर केला होता. ज्याला तुफान प्रतिसाद मिळाला होता.

मालिकेत सध्या डॉक्टर जेल बाहेर आला आहे. तर पुन्हा एकदा त्याची कारस्थानं सुरू झाली आहेत. पण आता चंदा वाड्यात आल्याने त्याची बोलती बंद झाली आहे. त्यामुळे पुढे नक्की काय घडणार पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Zee marathi serial