• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • VIDEO: 'देवमाणसाची' इन्स्टाग्रामवरसुद्धा हवा; फॉलोअर्सचा आकडा वाढला

VIDEO: 'देवमाणसाची' इन्स्टाग्रामवरसुद्धा हवा; फॉलोअर्सचा आकडा वाढला

अभिनेता किरण गायकवाडने ‘देवमाणूस’ मालिकेत साकारलेली भूमिका चाहत्यांच्या मोठ्या पसंतीस उतरली आहे.

 • Share this:
  मुंबई, 3 जुलै-  ‘देवमाणूस’ (Devmanus) मालिकेने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं आहे. मालिकेतील कलाकारांच्या सहज सुंदर अभिनयाने दर्शकांच्या मनावर गारुड घातलं आहे. मालिकेतील डॉक्टर म्हणजे अभिनेता किरण गायकवाडच्या (Kiran Gaikwad) अभिनयाचंदेखील विशेष कौतुक होतं आहे. खलनायक असूनसुद्धा चाहत्यांनी त्याला विशेष पसंती दर्शवली आहे. त्यामुळेचं किरण गायकवाडच्या चाहत्यांची संख्यादेखील वाढत चालली आहे. इन्स्टाग्रामवरसुद्धा त्याच्या फॉलोअर्समध्ये (Followers) विशेष भर पडली आहे.
  अभिनेता किरण गायकवाडने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडीओ शेयर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये  आपल्या वाढलेल्या फॉलोअर्सचा आकडा सांगत सर्वांचे आभार मानले आहेत. अभिनेता किरण गायकवाडने ‘देवमाणूस’ मालिकेत साकारलेली भूमिका चाहत्यांच्या मोठ्या पसंतीस उतरली आहे. त्यामुळेचं त्याच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. सध्या इन्स्टाग्रामवर किरणचे 250K फॉलोअर्स झाले आहेत. ही आनंदाची माहिती त्याने पोस्ट करत चाहत्यां दिली आहे. (हे वाचा:अमृता खानविलकरच्या डान्सला गीता मॉंची दाद; कमेंट् करत म्हणाली...  ) याआधी किरण गायकवाडने झी मराठीवरीलचं ‘लागीर झालं जी’ आणि ‘टोटल हुबलाक’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘लागीर झालं जी’ या मालिकेमुळे तो सर्वांच्या नजरेत आला होता. त्यातील त्याची भय्यासाहेब ही व्यक्तीरेखा दर्शकांना पसंत पडली होती. या मालिकेमध्येसुद्धा तो मुख्य खलनायक होता. यानंतर त्याने टोटल हुबलाक ही मालिका केली होती. मात्र ती फार काळ नाही चालली. त्यांनतर आलेल्या ‘देवमाणू’ या मालिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. निगेटीव्ह भूमिका असूनसुद्धा दर्शकांनी त्याला अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आहे. (हे वाचा: 16 वर्षानंतर झाला होता घटस्फोट; वाचा आमिर-रीनामध्ये का आला होता दुरावा) सध्या मालिकेत त्याने केलेल्या गुन्ह्यांमुळे तो कोर्टात उभा आहे. ACP दिव्या त्याचं सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहे. मात्र आपल्या धूर्त बुद्धीने तो यामधून पळवाट शोधत आहे. आत्ता दिव्या आणि सरकारी वकील आर्या त्याचं सत्य सर्वांसमोर कधी आणणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: