• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • अखेर देवमाणसानेही घेतलं Vaccine, लक्षवेधी कॅप्शनसह शेयर केला PHOTO

अखेर देवमाणसानेही घेतलं Vaccine, लक्षवेधी कॅप्शनसह शेयर केला PHOTO

अभिनेता किरण गायकवाड ‘देवमाणूस’ या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रिय झाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 6 जुलै- गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातलं होतं. सध्या परिस्थिती आटोक्यात येत असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर कोरोनाची लससुद्धा (Corona Vaccine) हळूहळू उपलब्ध होऊ लागली आहे. सर्वसामन्य लोक असो किंवा कलाकार स्लॉट उपलब्ध होतील त्या पद्धतीने लसीकरण करून घेत आहेत. नुकताच आज देवमाणूस’ (Devmanus) फेम अभिनेता किरण गायकवाडनेसुद्धा (Kiran Gaikwad) लस टोचून घेतली आहे. सोशल मीडियावरून त्याने याबद्दलची माहिती देत जनहिताचा संदेशसुद्धा दिला आहे.
  नुकताच अभिनेता किरण गायकवाडने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये तो कोरोना लसीकरण करत असल्याचं दिसत आहे. आज किरणने कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. आणि त्याचा फोटो शेयर करत त्याने एक महत्वाचा संदेशदेखील दिला आहे, किरणने फोटोला कॅप्शन देत म्हटलं आहे, ‘आपण किती जरी मॅनेज करायचा प्रयत्न केला,तरी कोरोना मॅनेज करू देणार नाही, म्हणून आज लस घेतली,...तुम्हीही घ्या’. फोटोचं कॅप्शन पाहून चाहते त्याचं कौतुक करत आहेत. तर काही चाहते त्याला काळजी घेण्याचं आवाहनसुद्धा करत आहेत. (हे वाचा:झोंका हवा का..' गाण्यावर स्वीटूच्या दिलखेच अदा; VIDEO पाहून पडाल प्रेमात  ) डॉ. अजितकुमार देव म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड ‘देवमाणूस’ या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रिय झाला आहे. खलनायकाची भूमिका असूनदेखील दर्शकांनी त्याला एखाद्या अभिनेत्याप्रमाणे प्रेम दिलं आहे. सध्या मालिकेमध्ये त्याच्या पापांचा घडा भरत आला आहे. त्याने केलेल्या निष्पाप महिलांच्या हत्येच्या आरोपात त्याला कोर्टात उभं करण्यात आलं आहे. मात्र आपल्या धूर्त बुद्धीने तो प्रत्येक वेळी यातून पळवाट काढण्यात यशस्वी होतं आहे. त्याच्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी आत्ता नेमका कोणता पुरावा मिळणार आणि तो डॉक्टर कधी फासावर लटकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: