मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Devmanus 2 : असा होणार 'देवमाणूस 2' चा शेवट; मालिका उत्कंठावर्धक वळणावर

Devmanus 2 : असा होणार 'देवमाणूस 2' चा शेवट; मालिका उत्कंठावर्धक वळणावर

Devmanus 2

Devmanus 2

बऱ्याच दिवसांपासुन कमी टीआरपीमुळे 'देवमाणूस 2' संपणार असल्याच्या चर्चा होत्या. पण आता अखेर देवमाणसाचा खेळ खल्लास होणार आहे.

  • Published by:  Nishigandha Kshirsagar
मुंबई, 19 ऑगस्ट : झी मराठीवरील 'देवमाणूस 2' मधील ट्विस्टची मालिका काही थांबायला तयार नाही.  अजितकुमार एकामागे एक  खून करत आहे पण इन्स्पेक्टर जामकर मात्र त्याला अटक करण्यात अपयशी ठरले आहेत.  या मालिकेत सारखे ट्विस्ट आणून मालिका आणखी रंजक बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. देवमाणूस २ आता अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोचली आहे.  पण आता मात्र अजितकुमारचा खेळ खल्लास होणार असल्याचं कळत आहे. कारण लोकांचा हा देवमाणूस लवकरच पोलिसांच्या तावडीत सापडणार आहे.  झी मराठीवर नुकताच नवीन मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून देवमाणूस संपणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण आता अखेर देवमाणसाचा शेवट कसा होणार याची माहिती समोर आली आहे. देवमाणूस मालिका लवकरच संपणार आहे. या मालिकेचा शेवट अजितकुमारला अटक होऊन होणार आहे. नुकताच देवमाणूस च्या इंस्टाग्राम पेजवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. त्या फोटोमध्ये अजितला अटक होऊन तो खाली बसलेला दिसत आहे. त्यासोबत मागे इन्स्पेक्टर जामकर आणि इतर पोलीस उभे राहिलेले दिसत आहेत. या फोटोमुळे चाहत्यांमध्ये अजित कसा पकडला जाणार याबद्दल प्रचंड उत्कंठा वाढली आहे.
इन्स्पेक्टर जामकर खूप दिवसांपासून अजितकुमारला अटक करण्याच्या प्रयत्नात आहे. पण त्याला अजितविरोधात काही पुरावा मिळत नाही. अजितने बज्याचा खून केल्यापासून जामकरचा अजितवर जास्तच राग आहे. आता नाम्या अजितकुमारविरोधात पुरावे शोधण्यासाठी जामकरला  मदत करणार आहे.  तसेच डिंपलनेदेखील अजितविरोधात पुरावा गोळा केला आहे. आता तो पुरावा ती जामकारला देऊन माफीची साक्षीदार होणार का, तिच्या पुराव्यामुळे अजित पकडला जाणार का हे बघण्याची प्रेक्षकांना आता प्रचंड उत्सुकता आहे. हेही वाचा - Mylek Marathi Movie: 'या' अभिनेत्रीची मुलगी करणार सिनेसृष्टीत पदार्पण, 'मायलेक'चा मुहूर्त संपन्न बऱ्याच दिवसांपासुन कमी टीआरपीमुळे 'देवमाणूस 2' संपणार असल्याच्या चर्चा होत्या. मालिका रंजक बनवण्यासाठी अनेक पात्रांची एंट्री करण्यात आली होती. तसेच इन्स्पेक्टर जामकरची एंट्री झाल्यापासून मालिकेचा टीआरपी वाढला होता. पण आता हि मालिका शेवटच्या वळणावर येऊन ठेपली असून काही भागात संपणार आहे. देवमाणूस मालिकेच्या जागेवर झी मराठीवर 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका येत्या 12 सप्टेंबरपासून  रात्री 10:30 वाजता पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री तितिक्षा तावडे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही नवी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी मालिका पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.
First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial

पुढील बातम्या