मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Bollywood Flashback! चित्रपटात Kissing सीन देणारी 'ही' होती पहिली अभिनेत्री

Bollywood Flashback! चित्रपटात Kissing सीन देणारी 'ही' होती पहिली अभिनेत्री

या अभिनेत्रीने 1933 मध्ये किसिंग सीन देत मनोरंजनसृष्टीत खळबळ माजवली होती.

या अभिनेत्रीने 1933 मध्ये किसिंग सीन देत मनोरंजनसृष्टीत खळबळ माजवली होती.

या अभिनेत्रीने 1933 मध्ये किसिंग सीन देत मनोरंजनसृष्टीत खळबळ माजवली होती.

मुंबई, 30 डिसेंबर-   सध्या मनोरंजनसृष्टीत   (Film Industry)  इंटिमेट सीन किंवा किसिंग सीन   (Kissing Scene)  देणं तितकसं अवघड समजलं जात नाही. मात्र एक काळ असा होता, जेव्हा स्त्रियांच्या नोकरी करण्यावरसुद्धा कुटुंबात विरोध केला जात होता. अशा वातावरणात एखाद्या मुलीनं चित्रपटसृष्टीत येणं आणि अभिनेत्री होणं ही फारच मोठी बाब होती. अशा वातावरणात एक मुलगी अशी होती जी फक्त अभिनेत्रीच नाही बनली तर तिनं हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला किसिंग सीनसुद्धा  (Bollywood First Kissing Scene)  दिला होता. त्या अभिनेत्री म्हणजे देविका रानी  (Devika Rani)  होय. त्यांनी 1933 मध्ये किसिंग सीन देत मनोरंजनसृष्टीत खळबळ माजवली होती.

सध्या अनेक मुली मनोरंजनसृष्टीत येतात आणि आपलं स्वप्न पूर्ण करतात. त्यांना त्यांच्या कुटुंबाचं सहकार्यसुद्धा असतं. मात्र एक काळ असा होता. जेव्हा मुलींना मनोरंजनसृष्टीत काम करणं शक्य नव्हतं. कारण नृत्य-अभिनय या गोष्टी अप्रतिष्ठित समजल्या जात होत्या. लोक आपल्या मुलींना या क्षेत्रात पाठवण्यासाठी तयार नसत. अशा वातावरणात देविका राणी यांनी पहिल्या भरतीत अभिनेत्री होण्याचा मान मिळवला होता. इतकंच नव्हे तर त्यांनी किसिंग सारखे बोल्ड सीन देत एकच खळबळ माजवून दिली होती. देविका राणी यांनी 1933 मध्ये आलेल्या 'कर्मा' या चित्रपटात एक किसिंग सीन दिला होता. भारतीय चित्रपटसृष्टीतील हा पहिला-वाहिला किसिंग सीन होता. देविका राणींच्या या धाडसाने सर्वांच्या भुवय्या उंचावल्या होत्या.

" isDesktop="true" id="650581" >

देविका राणी यांनी 'कर्मा' या चित्रपटात किसिंग सीन दिला होता. महत्वाचं म्हणजे हा किसिंग सीन तब्बल 4 मिनिटांचा होता. परंतु त्यांनी हा किसिंग सीन त्यांच्या पतीसोबतच दिला होता. त्या हिमांशू रॉय यांच्या पत्नी होत्या. देविका राणी आणि हिमांशू रॉय यांच्यावर हा किसिंग सीन चित्रित करण्यात आला होता. हा चित्रपट समोर येताच सर्वजण थक्क झाले होते. कारण असा बोल्ड सीन चित्रित करण्याची ही पहिलीच वेळ होती. हा चित्रपट भारतीय मनोरंजनसृष्टीला कलाटणी देणारा ठरला. त्यांच्या या धाडसाने भारतीय चित्रपटांना एक नवी ओळख मिळाली होती. इतकंच नव्हे तर इंग्रजी भाषेतील हा  पहिला भारतीय चित्रपट होता. देविका राणी यांनी तब्बल 10 वर्षे अभिनय क्षेत्रात काम केलं आहे. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी जीवन नैया, अछूत कन्या, जन्मभूमी अशा अनेक चित्रपटांत काम केलं आहे.

(हे वाचा:VIDEO: 'कांटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाने एयरपोर्टवर पतीला केलं KISS)

भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्यावहिल्या अभिनेत्री अशी देविका राणींची ओळख आहे. देविका राणी ह्या मूळच्या वालटेअर (विशाखापट्टणम) येथील आहेत. त्या रवींद्रनाथ टागोर यांच्या कुटुंबाशी देखील संबंधित होत्या. रवींद्रनाथ टागोर यांची बहीण ह्या देविका राणीच्या आजी होत्या. देविका राणींचे वडील कर्नल एस.एम.चौधरी हे मद्रास प्रांतातले पहिले सर्जन जनरल होते. वयाच्या नवव्या वर्षी शिक्षणासाठी त्या इंग्लडला गेल्या. स्थापत्यशास्त्राचं  शिक्षण घेतल्या नंतर मात्र त्यांनी आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला होता. लंडनला शिक्षण घेत असताना त्यांची ओळख हिमांशू रॉय यांच्याशी झाली होती. त्यांच्या या ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं होतं. या दोघांनी लग्नही केलं होतं. हिमांशू रॉय यांनी 'बॉम्बे टॉकीज' या संस्थेची स्थापना केली होती. यामध्ये त्यांनी अनेक प्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती केली आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment