मुंबई, 16 फेब्रुवारी- झी मराठीवरील किचन कल्लाकार हा शो कमी काळात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यास यशस्वी झाला आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातल्या मंडळींनी आतापर्यंत हजेरी लावली आहे. या शोमध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी नुकतीच हजेरी लावली. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या खाण्याच्या आवडीविषयी खुलासा केला. यावरून त्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. यामुळे त्या थेट ट्रोलर्सच्या (Amruta Fadnavis troll) निशाण्यावर आल्या आहेत.
किचन कल्लाकार या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडे करत आहे. यावेळी त्याने एका बैठकीत देवेंद्रजी किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? असा प्रश्न त्याने अमृता फडणवीस यांना विचारला. या प्रश्नावर ते 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तुपासोबत खायचे, असं उत्तर अमृता फडणवीसांनी दिलं. या प्रश्नानंत त्यांना लग्नानंतर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर त्यांना 30-35 पुरणपोळ्या खाताना पाहण्याची, त्याही मी न बनवलेल्या, असं उत्तर अम-ता फडणवीस यांनी दिलं. पुरणपोळीच्या प्रश्नावरून काहींनी अमृता यांना सोशल मीडियावर ट्रोल देखील केले आहे. त्यांचा हा किस्सा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा त्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या आहेत.
यासोबतच अमृता फडणवीस या किचन कल्लाकारमध्ये कोंबडी वडे बनवणार आहेत. यावरून देखील ट्रोलर्संनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.. एकाने म्हटलं आहे की, कोणताही पदार्थ बनवा पण गाणं नको. तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, कोंबडी स्पेशल राणेंकडून घ्यावी..अशी कमेंट एकाने केली आहे. तर पुरणपोळीवरून एकाने म्हटलं आहे की, पुरण पोळी करा 30 -35 आणि देवेन्द्रजीना खाऊ घाला😂😂पातले भर तुपात😂😂..अशा काही कमेंट करत अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. या शोमध्ये येऊन त्यांनी ट्रोलर्संन नवीन विषय दिला आहे.
.
View this post on Instagram
यावेळी देवेंद्र फडणवीस यांना पत्नी सुगरण आहे की आई, असा कोड्यात टाकणारा प्रश्न संकर्षणने देवेंद्र फडणवीय यांना विचारला. यावेळी देवेंद्र फडणवीस देखील गोंधळून गेले. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘प्रशांतजी असे प्रश्न विचारु नयेत. आईला म्हटले की तुझ्यापेक्षा बायकोच्या हातचा पदार्थ जास्त आवडतो तर आईला राग येणार नाही. पण जर याच्या उलट केले तर जगणे मुश्किल होई शकते. त्यामुळे असे प्रश्न विचारु नका.’ असे म्हटले.
या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांच्यासोबतच अभिनेत्री स्मिता जयकर आणि गायक स्वप्नील बांदोडकर हे कलाकार सहभागी झाले आहेत. त्यामुळे अमृता फडणवीस यांना कोणता पदार्थ तयार करण्याचं चॅलेंज मिळणार आणि विजेतेपदाचा मान कोण पटकावणार, याचा उलगडा आजच्या भागात होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amruta fadnavis, Devendra Fadnavis, Entertainment, Zee marathi serial