मुंबई, 25 जानेवारी : मुंबईत नुकतंच नव्या मेट्रो मार्गाच पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्धाटन करण्यात आलं. ट्रॅफिकच्या समस्यांनी कंटाळेल्या मुंबईकरांसाठी ही मेट्रो प्रवासाचा सुखकर मार्ग ठरत आहे. अनेक लोक मेट्रोनं प्रवास करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. अशातच अभिनेता सुमीत राघवननं देखील नव्या मुंबई मेट्रोनं प्रवास केला. त्यानंतर त्याचा अनुभव त्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विट करत सांगून त्यांचे आभार मानले. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमीत राघवनचे आभार मानत ट्विटला गाण्यातून रिप्लाय दिला आहे. फडणवीसांनी त्याच्या मन की बातच या गाण्यातून सांगितली असं म्हणायला काही हरकत नाही.
देवेंद्र फडणवीसांनी समीत राघवनचे आभार मानत 'थोडा है थोडे की जरूरत हैं' हे प्रसिद्ध गाणं शेअर करत पोस्ट लिहिली आहे. त्यानी लिहिलंय, 'समान्य माणसाची सेवा करण्यापेक्षा आणखी छान काय असणार. कौतुक केल्याबद्दल सुमीत राघवन तुमचे धन्यवाद. मुंबईकरांसाठी फील गुड वेळेची ही तर फक्त सुरूवात आहे. आपली मुंबई आणखी सुंदर आणि वेगवान होणार आहे. मुंबईकरांनो तुम्ही फक्त अशीच साथ देत रहा'.
हेही वाचा - Gandhi Godse: दिग्दर्शक राजकुमार संतोषींना जिवे मारण्याच्या धमक्या; मुंबई पोलिसांकडे केली 'ही' मागणी
Thank you so much Devendra ji. "Travel" has always been the biggest hurdle in the lives of MUMBAIKARS. Thank you once again. माझ्या ५२ वर्षात पहिल्यांदा मुंबईत सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करायला मजा आली. मुंबईकरांच्या वतीने आभार 🙏#MumbaiMetroOurMetro#MumbaiMetroZindabaad https://t.co/pxIeMkm1wQ
— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) January 25, 2023
अभिनेता सुमीत राघवन सोशल मीडियावर सक्रीय असतो. तो नेहमीच अनेक विषयांवर भाष्य करताना दिसतोय. त्याची मतं तो ट्विटच्या माध्यमातून मांडत असतो. सुमीतनं मुंबई मेट्रोच्या नव्या मार्गावर प्रवास करत व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओ शेअर करत, 'गणपती बाप्पा मोरया. मला मी एखाद्या खेळण्याच्या दुकानात आल्याप्रमाणे वाटत आहे. मुंबईकरांसाठी हे सर्वोत्तम गिफ्ट आहे. धन्यवाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस', अशी पोस्ट लिहिली. सुमीतची हिच पोस्ट आज देवेंद्र फडणवीसांनी शेअर करत त्याला गाण्यातून रिप्लाय दिला.
सुमीतनं फडणवीसांनी मानलेल्या आभाराची पोस्ट शेअर करत लिहिलंय, 'देवेंद्रजी तुमचे खूप खूप आभार. मुंबईकरांच्या आयुष्यात प्रवास हा नेहमीच मोठा अडथळा राहिला आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. माझ्या 52वर्षात पहिल्यांदा मुंबईत सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करायला मजा आली. मुंबईकरांच्या वतीने आभार'.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Marathi entertainment, Marathi news