'जय मल्हार'चा देवदत्त बनला निर्माता, घेऊन येतोय 'चेंबूर नाका'

हा चित्रपट एक अॅक्शनपट आहे. देवदत्त एका वेगळ्या भूमिकेत बघायला मिळणार आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2017 07:15 PM IST

'जय मल्हार'चा देवदत्त बनला निर्माता, घेऊन येतोय 'चेंबूर नाका'

13 आॅगस्ट : जय मल्हार मालिकेतील खंडोबाच्या भूमिकेमुळे गाजलेला अभिनेता देवदत्त नागे आता 'चेंबूर नाका' हा चित्रपट करतोय. नुकतीच मुंबईत देवदत्त नागेने याबद्दलची घोषणा केली. या चित्रपटात देवदत्त प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. शिवाय तो या चित्रपटाचा निर्माता देखील आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश पवार करताहेत. तर निर्माता डॉ. सीमा नितनवरे आहेत. हा चित्रपट एक अॅक्शनपट आहे.  देवदत्त एका वेगळ्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. देवदत्तसोबत उषा नाडकर्णी, मिलिंद शिंदे , विद्याधर जोशी यांच्याही भूमिका आहेत. पुढच्या वर्षी हा चित्रपट रिलीज होईल.

सध्या देवदत्त 'वेलकम टु पटाया' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. देवदत्तचा खंडोबा घराघरात पोचला होता. 'जय मल्हार'  मालिकानं त्याला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. आता त्याची ही लोकप्रियता चित्रपटातून कायम राहते का ते पाहायचं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2017 07:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...