माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्याचं 'हे' गाणं बनलं नंबर वन

युके ईस्टर्न ऑय या वर्तमानपत्रानं 50 बाॅलिवूडच्या सर्वोत्तम गाण्यांची यादी प्रसिद्ध केलीय.

News18 Lokmat | Updated On: Nov 14, 2018 11:29 AM IST

माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्याचं 'हे' गाणं बनलं नंबर वन

मुंबई, 14 नोव्हेंबर : संजय लीला भन्साळीचा देवदास सिनेमा 2002ला रिलीज झाला होता. त्यावेळी भव्यदिव्य सिनेमावर परीक्षकांनी टीकाही केली होती. पण तरीही बाॅक्स आॅफिसवर हा सिनेमा चांगला चालला होता. इतक्या वर्षांनीही हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आलाय.


युके ईस्टर्न ऑय या वर्तमानपत्रानं 50 बाॅलिवूडच्या सर्वोत्तम गाण्यांची यादी प्रसिद्ध केलीय. त्यात डोला रे डोला हे गाणं नंबर वन ठरलंय. हे गाणं ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षितवर चित्रित झालेलं. सिनेमातला हा अत्युच्च क्षण होता.Loading...


कोरिओग्राफी, लोकांचं मतदान, गाण्याचा प्रभाव, लोकप्रियता हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन या गाण्याला नंबर वन ठरवलंय. देवदासमध्ये मुख्य भूमिका शाहरुख खाननं साकारली होती.


पुलीमुरुगन या दाक्षिणात्य सिनेमाच्या हिंदी रिमेकचा भंसाळी विचार करत आहेत. त्यासाठी त्यांनी हृतिक रोशनला प्रमुख भूमिकेसाठी विचारलं.पण हृतिक रोशनने मात्र चक्क भंसाळींना साफ नकार दिला.


संजय लीला भंसाळी शाहरुख-सलमानला एकत्र घेऊन सौदागर सिनेमाचा रिमेक करणार आहेत. पटकथा पूर्ण व्हायला अजून 9 महिने लागणार आहेत. दिलीप कुमार आणि राज कुमार यांच्या भूमिकांमध्ये शाहरूख-सलमान दिसतील. पटकथा पूर्ण झाली की संजय लीला भन्साळी दोघांशी बोलणार आहेत.


सलमान-शाहरूखनं करण अर्जुन, कुछ कुछ होता है, हम तुम्हारें हैं सनम या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं. नुकताच शाहरूखच्या झीरोचा ट्रेलर रिलीज झाला.


झिरो हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. ज्यात शाहरुख खानने लहान उंचीच्या माणसाची व्यक्तिरेखा साकारली आहे. प्रत्येक वेळी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात छाप पाडणारा कलाकार शाहरूख खान यावेळीसुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकेल असा विश्वास निर्मात्यांना आहे. चित्रपटात अभिनेत्री अनुष्का शर्मा ही नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. कतरिना कैफ सेलिब्रिटी हिरोईनची भूमिका साकारत आहे.


Photos : दीपिकाच्या हातावर लागली रणवीरच्या नावाची मेहंदीबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2018 11:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...