'या' दोन पुणेकरांनी साकारली बंदी 'देवसेना'

'या' दोन पुणेकरांनी साकारली बंदी 'देवसेना'

पुण्याच्या प्रताप बोऱ्हाडे आणि डी. एन. इरकर या जोडीने बाहुबली-२ या चित्रपटात 25 वर्ष बंदी बनवलेली देवसेना साकारलीय.

  • Share this:

हलिमा कुरेशी, पुणे

08 मे : पुण्याच्या प्रताप बोऱ्हाडे आणि डी. एन. इरकर या जोडीने बाहुबली-२ या चित्रपटात 25 वर्ष बंदी बनवलेली देवसेना साकारलीय. बदल्याची भावना राग,आनंद,द्वेष हे सगळं त्या चेहऱ्यात उमटलंय.

या जोडीने 'उडता पंजाब ' मध्ये आलिया भट चा वैशिष्ट्यपूर्ण मेकअपही केला होता. तो मेकअफ राजामौली यांना आवडला आणि थेट राजा मौली यांनी देवसेनेच्या वृद्ध वय साकारण्याची जबाबदारी या जोडीकडे दिली. बाजीराव मस्तानी, मर्दानी अशा हिंदी तसंच इराणी सुप्रसिद्ध दिग्दर्शक माजिद माजिदी यांच्याबरोबर देखील काम केलं.

आधी क्ले मॉडेल,मग मोल्ड अशा पाच ते सहा टप्प्यात हे काम होतं. भोसरी येथे डी एन स्टुडिओत अनेक पात्रांना आकार देण्यात आलाय. बाहुबलीचा अनुभव सांगताना, आम्हाला पण माहीत नव्हतं की कटप्पान बाहुबलीला का मारलं.

दिग्दर्शक राजा मौली यांच्या कामाची पद्धत देखील खूप चांगली असल्याचं प्रताप आणि डी एन यांनी सांगितलं. प्रताप बोऱ्हाडे 20 वर्षांपासून मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतात तर डी एन यांची कारकीर्द दहा वर्षांची आहे.

First Published: May 8, 2017 08:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading