'देवा'च्या रिलीजचा मार्ग सुकर, सिनेमा 225 स्क्रीन्सवर झळकणार

मनसेच्या आंदोलनाला यश मिळालं आणि देवा चित्रपटाला 225 शोज् मिळालेत. आता 'टायगर जिंदा है'सोबत देवा रिलीज होणार आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 21, 2017 05:28 PM IST

'देवा'च्या रिलीजचा मार्ग सुकर, सिनेमा 225 स्क्रीन्सवर झळकणार

21 डिसेंबर : टायगर जिंदा है आणि देवा सिनेमाची लढाई सुरू होती. टायगर जिंदा है सिनेमामुळे 'देवा'ला एकही थिएटर मिळत नव्हतं. त्यामुळे मनसेनं इशाराही दिला होता. मनसेच्या आंदोलनाला यश मिळालं आणि  देवा चित्रपटाला 225 शोज् मिळालेत. आता 'टायगर जिंदा है'सोबत देवा रिलीज होणार आहे.  देवा या चित्रपटाला स्थान द्या, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीनं ती मिळवून देऊ, असं धमकीवजा पत्रच मनसे चित्रपट सेनेनं काढलं होतं.

दोन्ही सिनेमे येत्या शुक्रवारी रिलीज होतायत. देवामध्ये अंकुश चौधरी, तेजस्विनी पंडित, स्पृहा जोशी आहेत. अंकुश चौधरीनं अतरंगी व्यक्तिरेखा साकारलीय.  चार्ली या दाक्षिणात्य सिनेमावर देवा आधारित आहे.

दुसरीकडे 'टायगर जिंदा है'चे जवळजवळ सगळे शोज हाऊसफुल झालेत. सलमान खानच्या फॅन्ससाठी सल्लूमियाँचा सिनेमा ही एक पर्वणीच आहे. सलमान-कतरिनाची जोडी हाही एक सिनेमाचा युएसपी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2017 05:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...