इतकं कमी उत्पन्न असतानाही रियाच्या मुंबईत 2 प्रॉपर्टी, ED ने चौकशी केली अधिक कडक

इतकं कमी उत्पन्न असतानाही रियाच्या मुंबईत 2 प्रॉपर्टी, ED ने चौकशी केली अधिक कडक

यापैकी एक प्रॉपर्टी रिया आणि दुसरी प्रॉपर्टी तिच्या कुटुंबीयांच्या नावावर आहे.

  • Share this:

मुंबई, 6 ऑगस्ट : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती हिला ईडीने चौकशी कडक केली आहे. ईडीने या प्रकरणात मनी ट्रेलच्या तपासात गुंतली आहे. ईडीने सूत्रांकडून माहिती मिळवली आहे की गेल्या काही वर्षात रियाची नेट कमाई 10 लाख ते 12 लाख आणि नंतर 14 लाखांपर्यंत पोहोचली आहे. ईडीच्या सूत्रांनी इन्कम टॅक्स रिटर्नच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

अत्यंत कमी उत्पन्न असतानाही रिया चक्रवर्तीने मुंबईत 2 प्रॉपर्टी खरेदी केली आहे. यामध्ये एक रिया आणि दुसरी प्रॉपर्टी तिच्या कुटुंबीयांच्या नावावर आहे. रियाने या दोन्ही प्रॉपर्टीसाठी कुठून पैसे दिले त्याबाबत अद्याप माहिती समोर आली आहे. काहीतरी गोंधळ असल्याचे लक्षात आल्यावर ईडीने या प्रॉपर्टीचे कागदपत्र मागितले आहेत. गुरुवारपर्यंत याबाबत कागदपत्र मिळण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात सुशांत सिंह राजपूतच्या 2 कंपन्यांचा तपास करण्यात आला आहे. एक कंपनी दिल्लीत आहे त्याचा तपास होण अद्याप बाकी आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने सुशांत सिंह याचा सीएशी याबाबत चौकशी केली. मात्र सीएच्या उत्तरामुळे ईडी समाधानी झाली नाही. प्रॉपर्टीशी संबंधित चौकशीसाठी ईडीने रिया चक्रवर्तीला इमेल पाठवला आहे. अद्याप यावर प्रत्युत्तर आलेलं नाही.

हे वाचा-समीरने दिले होते आत्महत्येचे संकेत?सुशांतच्या मृत्यूनंतर शेअर केली होती ही पोस्ट

दरम्यान दिल्ली CBIनं एकूण 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रिया चक्रवर्ती, तिचे वडील-आई, भाऊ शोविक चक्रवर्ती, मित्र सॅन्मुयल मिरांडा, श्रुती मोदीसह एका अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारी कट रचणे, आत्महत्येस जबाबदार असणे, अडवणूक करणे, चोरी, विश्वासघात करणे, फसवणूक करणे, कट रचणे या अंतर्गत , कलम 120 B,306,341,342,380,406,420,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 6, 2020, 10:40 PM IST

ताज्या बातम्या