घटस्फोटानंतरही मलायका अरबाजसोबत करतेय 'दबंग 3'

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2017 07:01 PM IST

घटस्फोटानंतरही मलायका अरबाजसोबत करतेय 'दबंग 3'

17 एप्रिल :   बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि मलायकाने गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या घटस्फोटची अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर दोघांचे मार्ग जरी वेगवेगळे झाले असले तरी मलायका कदाचित खान कुटुंबापासून दूर होऊ शकली नाही.

अरबाज खानच्या 'दबंग-3' सिनेमात मलायका पुन्हा एकदा झळकणार आहे. 'दबंग-3'मध्ये मी आयटम साँगच्या व्यतिरिक्त अभिनय सुद्धा करणार असल्याचं मलायकाने एका मुलाखतीमध्ये सांगितलंय. या सिनेमासाठी दोन अभिनेत्री एकत्र काम करतील असंही अरबाजने म्हटल होतं.

'दबंग सिनेमांच्या सीरिजमध्ये माझा निर्माता म्हणून सहभाग होता. यापुढेही माझं आणि अरबाजच प्रोफेशनल नातं असंच राहिलं,असंही मलायकाने म्हटलं होतं. दबंग सिनेमांच्या सीरिजमधील मलायकाचा आयटम सॉँगचा तडका प्रेक्षकांच्या पसंतीस तर पडतोच पण त्यामुळे सिनेमा हिट सुद्धा होतो. 'एक था टाइगर' सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर 'दबंग -3' चं प्री-प्राॅडक्शन चालू केलं जाईल, असं अरबाजने सांगितल होतं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2017 07:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...