Home /News /entertainment /

'देसी गर्ल' ठरली नंबर वन, या बाबतीत टाकलं सलमान, अक्षयलाही मागं...

'देसी गर्ल' ठरली नंबर वन, या बाबतीत टाकलं सलमान, अक्षयलाही मागं...

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मंगळवारी आपल्या अनुभवांवर आधारित पुस्तकाबाबत खुलासा केला आहे. 'अनफिनिश्ड' (Unfinished) पुस्तक लिहून संपल्याचे तिने यावेळी सांगितले. लवकरच याचे प्रकाशन होणार आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मंगळवारी आपल्या अनुभवांवर आधारित पुस्तकाबाबत खुलासा केला आहे. 'अनफिनिश्ड' (Unfinished) पुस्तक लिहून संपल्याचे तिने यावेळी सांगितले. लवकरच याचे प्रकाशन होणार आहे.

देसी गर्ल प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra brand value) आपल्या अभिनयाच्या जोरावर सातासमुद्रापारही ग्लॅमर मिळवलंय. आता आणखी एका बाबतीत ती लक्षवेधी ठरली आहे.

    मुंबई, 24 डिसेंबर : देसी गर्ल प्रियांका चोप्राचे (Priyanka Chopra) चाहते केवळ भारतात नाही तर जगभरात आहेत. तिच्या चाहत्यांसाठी आलीय एक मोठ्ठी खूशखबर! या देसी गर्ल पिग्गी चॉप्स अर्थात प्रियांका चोप्रानं ब्रँड वॅल्यूच्या (Brand Value) शर्यतीत दोन तगड्या स्टार्सनाही मागं टाकलं आहे. खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि दबंग सलमान खान (Salman Khan) यांना मागं टाकत तिनं हा बहुमान मिळवलाय. ऑनलाईन सेंटीमेंट ऍनालिसिस कंपनी चेकब्रँडनं ही माहिती दिली आहे. ही कंपनी फिल्म स्टार्सची ब्रँड वॅल्यू ठरवते. कंपनीच्या अहवालानुसार, प्रियांका चोप्राची ब्रँड वॅल्यू आहे 2.65 अब्ज रुपये. अक्षय कुमारची ब्रँड वॅल्यू आहे 2.60 अब्ज रुपये. सलमान खानची ब्रँड वॅल्यू 2.52 अब्ज आहे. सोबतच दीपिका पदुकोण या आघाडीच्या अभिनेत्रीची ब्रँड वॅल्यू 2.11 अब्ज तर किंग खान शाहरुखची ब्रँड वॅल्यू 2.09 अब्ज रुपये आहे. या सिनेसिताऱ्यांचे फॉलोवर्स आणि एंगेजमेंट यांच्यावर आधारित ब्रँड वॅल्यू कंपनीनं ठरवली आहे. पहिल्या तीन स्थानांवर अभिनेत्रींनीच बाजी मारली आहे. मागच्या तीन महिन्यात क्रिती सेनन सर्वाधिक ट्रेंडमध्ये होती. दुसऱ्या क्रमांकावर प्रियांका चोप्रा आणि तिसऱ्या क्रमांकावर आलिया भट होती. यानंतर अनुक्रमे अक्षय कुमार, सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान ट्रेंडमध्ये राहिले. फक्त एंगेजमेंटच्या आधारे बोलायचं तर पहिल्या तीन क्रमांकावर अभिनेते आहेत. सलमान खानची एंगेजमेंट 2.25 लाख, शाहरुखची 2.16 लाख आणि अक्षय कुमारची 1.7 लाख इतकी होती. यानंतर अजय देवगणचा स्कोअर 0.64 लाख आणि अमिताभ बच्चनचा स्कोअर 0.62 लाख इतका राहिला. असे एकूण 7 सिनेस्टार्स आहेत, ज्यांनी सोशल मीडिया मेन्शन या निकषावर 1 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. या स्टार्समध्ये सलमान खान, शाहरुख खान, कंगना राणावत, अक्षय कुमार, अजय देवगण, आमीर खान आणि आलिया भट यांचा सहभाग आहे. विशेष गोष्ट ही, की इतक्या लोकप्रियतेनंतर अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर सारख्या अभिनेत्री मागच्या तीन महिन्यात 500व्या क्रमांकाच्याही खाली राहिल्या.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Akshay Kumar, Priyanka chopra, Salman khan

    पुढील बातम्या