'पद्मावत'साठी 'या' थिएटरचं तिकीट आहे 2400 रुपये!

'पद्मावत'साठी 'या' थिएटरचं तिकीट आहे 2400 रुपये!

दिल्लीच्या 'पीव्हीआर डायरेक्टर्स कट- एम्बियंस' या थिएटरचं 'पद्मावत'साठी तिकीट आहे 2400 रुपये.

  • Share this:

23 जानेवारी : पद्मावत सिनेमाला सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदिल दाखवला. सिनेमाला कोणीही कितीही विरोध करत असलं तरी प्रेक्षकांचा उत्साह काही कमी होत नाहीय. सगळीकडे सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालंय. पण प्रेक्षक 2400 रुपये खर्च करून सिनेमाचं तिकीट काढतील?

दिल्लीच्या  'पीव्हीआर डायरेक्टर्स कट- एम्बियंस' या थिएटरचं 'पद्मावत'साठी तिकीट आहे 2400 रुपये. देशातलं हे एक प्रसिद्ध थिएटर. याची तिकिटं स्पेशल सिनेमाच्या वेळी महागच असतात. बाहुबली 2 आणि टायगर जिंदा है सिनेमाच्या वेळीही 2400 रुपयांची तिकिटं विकली गेली होती.

अनेक थिएटर्समध्ये मोठ्या सिनेमांची तिकिटं महागच असतात. पण तरीही 2400 रुपये हा आकडा ऐकून भुवया उंचावतात. असो. आता पद्मावतसाठी रसिक एवढे रुपये मोजायला तयार होतात का हे पाहायचं.

First published: January 23, 2018, 5:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading