मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Kangana Ranaut विरोधात दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीद्वारे तक्रार दाखल

Kangana Ranaut विरोधात दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीद्वारे तक्रार दाखल

Kangana Ranaut

Kangana Ranaut

ड्रामा क्विन कंगना रणौत (Kangana Ranaut)ने रद्द करण्यात आलेल्या कृषी कायद्यावरुन वादग्रस्त वक्तव्य करत नवा वाद स्वतःच्या अंगावर ओढून घेतला.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर: वादग्रस्त वक्तव्यामुळे ड्रामा क्विन कंगना रणौत (Kangana Ranaut) नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी कंगनाने 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य ही भीक मिळाली आहे, असे वक्तव्य केले होते. हे प्रकरण ताजेअसतानाच रद्द करण्यात आलेल्या कृषी कायद्यावरुन वादग्रस्त वक्तव्य करत नवा वाद स्वतःच्या अंगावर ओढून घेतला आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीद्वारे (The Delhi Sikh Gurdwara Management Committee) कंगनाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कंगनाच्या विरोधात दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार इन्स्टाग्रामवर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आली आहे. या समितीने दिलेल्या माहितीनुसार, कंगनाच्या विरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार ही मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील सायबर सेलमध्ये करण्यात आली आहे.

या शीख समुदायाच्या मते, कंगनाने जाणीवपूर्वक शेतकरी आंदोलन हे खलिस्तानी आंदोलन असल्याचे वर्णन केले आहे. तसेच तिने शीख समुदायविरोधात वक्तव्य करतेवेळी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषेचा वापर केला आहे, असे शीख समुदायाचे म्हणणं आहे.

'कंगना तुरुंगात किंवा मानसिक रुग्णालयात पाठवा'

दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा यांनी शिखांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल कंगनावर टीका केली. तिच्यावर सरकारने कारवाई करावी, असे ते म्हणाले. त्याने ट्विट करून म्हटले की, 'कंगनाला एकतर मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवले पाहिजे किंवा तुरुंगात पाठवले पाहिजे. अशी मागणी सिरसा यांनी केली आहे.

भावना दुखावण्याच्या हेतूने कंगनाची पोस्ट

तसेच दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने दिलेल्या माहितीनुसार, “शीख समुदायाच्या भावना दुखावण्याच्या हेतूने ही पोस्ट जाणूनबुजून तयार करण्यात आली होती. त्यानंतर ती सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो की या वक्तव्याविरोधात प्राधान्याने तक्रार दाखल करुन घ्यावी. तसेच याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे या व्यवस्थापन कमिटीने पोलिसात तक्रार दाखल करताना म्हटले आहे.

त्यांनी एफआयआर नोंदवण्यासाठी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 124A (देशद्रोह), 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) आणि 505 (सार्वजनिक क्षोभ निर्माण करणारे विधान) अंतर्गत अभिनेत्रीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

कंगनाची काय होती पोस्ट?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. मोदी सरकारच्या या निर्णयावर अभिनेत्री कंगना रणौतने नाराजी व्यक्त केली होती. कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद असल्याचे सांगून कंगना रणौतने मोदी सरकारचा हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक आहे, असे म्हटले होते.

First published:

Tags: Entertainment, Farmer protest, Kangana ranaut, Pm modi, Punjab