मुंबई, 27 जानेवारी : अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिस मागच्या वर्षभरापासून सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी मनीलाँड्रिंग प्रकरणात सातत्यानं चर्चेत आली आहे. या प्रकरणामुळे जॅकलिनच्या विदेश प्रवासावर बंदी आली होती. पण अखेर जॅकलिनच्या विदेश प्रवासाच्या वाटा आता मोकळ्या झाल्या आहेत. पटियाला हाऊस कोर्टानं अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला विदेश प्रवास करण्यासाठी परवानगी दिली आहे. जॅकलिन लवकरच दुबईला निघणार आहे. परंतू हा प्रवास जॅकलिनला कोर्टाच्या अटी शर्तींवर करावा लागणार आहे. विदेश प्रवासादरम्यान जॅकलिन कुठे कुठे जाणार याची आधीच कल्पना तिला कोर्टाला द्याव्या लागणार आहेत.
जॅकलिन फर्नाडिसनं कोर्टाला विदेश प्रवासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती. पेप्सिको इंडिया संमेलनात जॅकलिनला सहभागी व्हायचे होते. हे संमेलन दुबईत भरणार आहे. त्यासाठीच जॅकलिननं कोर्टाकडे दुबईला जाण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली होती. जॅकलिन तिच्या प्रोफेशनल कमिटमेंटसाठी विदेशात जाणार आहे.
हेही वाचा - Oscar 2023 Nominations: ऑस्करसाठी जॅकलिनच्या 'अप्लॉज' गाण्यालाही नॉमिनेशन; 'नाटू नाटू' बरोबर होणार टक्कर
Rs 200 crore money laundering case | Delhi's Patiala House Court allows actor Jacqueline Fernandez to travel to Dubai to attend a conference
— ANI (@ANI) January 27, 2023
जॅकलिननं 27-3 जानेवारीपर्यंत दुबईला जाण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर ईडीनं जॅकलिन दुबईला जाण्यासाठी विरोध केला होता. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात जॅकलिननं तिच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी विदेशात जाण्याची मागणी केली होती. त्यासाठी तिनं याचिका देखील सादर केली होती. मात्र कोर्टानं याचिका नाकारली होती. यावेळी मात्र जॅकलिनला दिलासा मिळाला आहे.
200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेशबरोबरची मुख्य आरोप आहे. या प्रकरणात जॅकलिनची ईडीकडून अनेकदा चौकशी करण्यात आली आहे. ईडी चौकश्यांसाठी जॅकलिनला मागील वर्षभर पटियाला कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या आहेत.
दरम्यान जॅकलिन फर्नाडिसच्या 'टेल इट लाइक अ वुमन' या सिनेमातील 'अल्पॉज' या गाण्याला ऑस्कर 2023चं नामांकन मिळालं आहे. बेस्ट ओरिजिनल साँग कॅटेगिरीमध्ये हे नामांकन मिळालं आहे. त्यामुळे आता कुठेतरी जॅकलिनला दिलासा मिळाला आहे असं म्हणावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News