Chhapaak : दीपिकाच्या अडचणीत वाढ, ‘हा’ आदेश न पाळल्यास छपाक दिसणार नाही चित्रपटगृहात

Chhapaak : दीपिकाच्या अडचणीत वाढ, ‘हा’ आदेश न पाळल्यास छपाक दिसणार नाही चित्रपटगृहात

दिल्ली हायकोर्टानं फेटाळली छपाक चित्रपटाची याचिका, 15 जानेवारीनंतर दिसणार नाही चित्रपटगृहात.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोनच्या अडचणी संपताना दिसत नाही आहेत. याआधी जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर विद्यार्थ्यांना दिलेल्या भेटीनंतर छपाक सिनेमावर बंदी घालण्याची मागणी सोशल मीडियावर करण्यात आली होती. दरम्यान आता छपाक सिनेमाची कहानी आधारित असलेल्या अ‍ॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्यात वकील अपर्णा भट्ट यांनी श्रेय न दिल्याप्रकरणी याचिका दाखल केली होती. आता दिल्ली हाय कोर्टानं वकील अपर्णा भट्ट यांना श्रेय देण्याच्या प्रकरणात फॉक्स स्टुडिओची याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने पटियाला हाऊस कोर्टाच्या निर्णयाला न्याय्य ठरविले आहे.

छपाक हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधी अपर्णा भट्ट यांनी पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात, पटियाला हाऊस कोर्टाने चित्रपट निर्मात्यांना अपर्णा भट्टला प्रदर्शित होण्यापूर्वी त्याचे श्रेय देण्याचे आदेश दिले. यानंतर, छपाक सिनेमा बनणार्‍या फॉक्स स्टुडिओने पटियाला कोर्टाच्या हाऊसच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले.

वाचा-Chhapaak vs Tanhaji Box Office Collection Day 1: छपाक Vs तानाजी, पहिल्या दिवशी कुणी केली जास्त कमाई?

वाचा-Tanhaji रीलिज होताच JNU बद्दल बोलला अजय देवगण; नाव न घेता दीपिकाला दिला सल्ला?

पटियाला हाऊस कोर्टाने अ‍ॅसिड अटॅक पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्या वकील अपर्णा भट्ट यांच्या याचिकेवर सुनावणी घेत या याचिकेवर आपला निर्णय दिला. छपाकच्या रिलीजच्या आधी चित्रपटात अपर्णा भट्ट यांना क्रेडिट देण्याचे आदेश कोर्टाने निर्मात्यांना दिले होते. त्यामुळे हाय कोर्टाच्या निर्णयानंतर चित्रपट निर्मात्याला आता वकील अपर्णा भट्ट यांना श्रेय द्यावे लागणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की अपर्णा भट्ट यांना श्रेय न दिल्यास 15 जानेवारीपासून चित्रपटगृहात सिनेमा दिसणार नाही. तर, 17 जानेवारीपासून इतर ठिकाणी बंदी घातली जाईल.

वाचा-Chhapaak टॅक्स फ्री करण्याची आव्हाडांची भूमिकेवरून Twitter युद्ध

छपाक सापडला होता वादात

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोनच्या 'छपाक'वरून सध्या देशभर चर्चा सुरू आहे. दीपिका जेएनयुमधल्या विद्यार्थ्यांना भेटायला गेली आणि वादाची ठिणगी पडली. 'छपाक'वर बहिष्कार घाला अशी मागणी होऊ लागली. त्यानंतर लक्ष्मीवर अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव नदीम खान असं होतं मात्र सिनेमात त्या व्यक्तिरेखेचं नाव राजेश असं ठेवण्यात आलं आहे. मात्र त्यानंतर या बातम्या फेक असल्याचे समोर आले होते.

Published by: Priyanka Gawde
First published: January 11, 2020, 12:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading