Home /News /entertainment /

राजकुमार रावचा काँडम तोंडाजवळ घेतानाचा सीन पाच वर्षानंतर VIRAL; सेन्सॉरने घेतला होता आक्षेप

राजकुमार रावचा काँडम तोंडाजवळ घेतानाचा सीन पाच वर्षानंतर VIRAL; सेन्सॉरने घेतला होता आक्षेप

एखाद्या सिनेमातले Deleted scene सोशल मीडियावर viral होणं ही काही नवी गोष्ट नाही. पण 5 वर्षांपूर्वीच्या एका सिनेमातला काढून टाकलेला सीन आता viral होतो आहे.

  मुंबई, 19 ऑक्टोबर : एखाद्या सिनेमातले Deleted scene सोशल मीडियावर viral होणं ही काही नवी गोष्ट नाही. पण साधारण पणे गाजलेल्या नव्या सिनेमातले सीन सोशल मीडियावर येत असतात. अभिनेता राजकुमार रावच्या 5 वर्षांपूर्वी रीलिज झालेल्या Trap नावाच्या सिनेमातला एक सीन मात्र आता व्हायरल झाला आहे. दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानीने सोमवारी Instagram पोस्ट द्वारे एक फोटो शेअर केला. तो या डिलीटेड सीनमधला आहे. या फोटोत राजकुमार राव हातात काँडम धरून ते तोंडापाशी नेताना दिसत आहे. सेन्सॉर बोर्डाने या सीनवर आक्षेप नोंदवल्यामुळे तो काढून टाकावा लागला होता.  देव डी, उडान, लुटेरा यासारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक मोटवानीने राजकुमार राव  हा  पाच वर्षं आधीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. राजकुमार राव नैसर्गिक हा त्याच्या अभिनयामुळे लोकांमध्ये लोकप्रिय आहे. त्याने आत्तापर्यंत बरेच चित्रपट केले आहेत ज्यातील त्याची भूमिका ही उत्तम राहिली असते. तो कायम साधेपणामुळे लोकांमध्ये लोकप्रिय आहे व तो लोकांचा आवडता अभिनेता आहे. शादी मे जरूर आना, काय पो चे, स्त्री या चित्रपटातील त्याची भूमिका ही खूपच उत्तम आहे. ट्रॅप या 2016 मध्ये विक्रमादित्यने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील एका सीनच्या चित्रीकरणावेळेचा एक फोटो आहे. त्यात राजकुमार राव एका खोलीत बसून काँडोम चोखताना दिसतो आहे. या सीनवर सेन्सॉर बोर्डानी आक्षेप घेतला होता. या फोटोसाठी विक्रमादित्यनी कॅप्शन दिली आहे, ‘आजच्याच दिवशी, पाच वर्षांपूर्वी.’ काय होता सीन? याबाबत विक्रमादित्यनी म्हटलंय, ‘आम्हाला सेन्सॉर  बोर्डाकडून हा सीन हटवण्यासाठी सांगितले तेव्हा मी त्याचं कारण विचारलं. तेव्हा त्यांनी मला विचारलं की याने काँडम  तोंडाजवळ का नेलाय.  त्यावेळी‌ मी सांगितलं की, चित्रपटात त्याच्या व्यक्तिरेखेला भूक लागली आहे. त्याला खायला काही नाही. त्यामुळे तो स्ट्रॉबेरी फ्लेवरचा काँडोम चोखत आहे. परंतु त्यांना ते समजलंच नाही आणि मला तो सीन काढावा लागला.’
  आपल्या समाजात अजूनही सेक्स बाबतीत तितकं मोकळेपणाने बोललं जात नाही. म्हणूनच समाजाच्या दृष्टीने सेन्सॉर बोर्डाने हा सीन हटवण्याचे आदेश दिले. मोटवानी हा चित्रपटाचा निर्माताही होता. निर्माते विक्रमादित्य मोटवानी यांना ही गोष्ट खटकली होती. आता पाच वर्षांनी हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या चित्रपटात एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करणाऱ्या मुलाची कथा होती. तो 20 दिवस अन्न पाण्याविना एका घरात अडकून पडतो तेव्हा काय होतं ते यात दाखवण्यात आलं होतं.
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: Rajkumar rao

  पुढील बातम्या