दीपिकासमोर 'पद्मावती'चं नवं आव्हान

Sonali Deshpande | Updated On: Mar 28, 2017 06:55 PM IST

दीपिकासमोर 'पद्मावती'चं नवं आव्हान

28 मार्च : दीपिका पदुकोण 'पद्मावती'ची व्यक्तिरेखेसाठी भरपूर मेहनत घेतेय. त्यासाठी ती कसलीच कसर सोडत नाहीय. पद्मावतीसाठी ती सध्या अभ्यास करतेय राजस्थानच्या इतिहासाचा.

ती आपला वेळ कुठेच वाया घालवत नाहीय. त्यासाठी ती यावेळचा कान फेस्टिवललाही गेली नव्हती. ती म्हणाली, ' जोपर्यंत पद्मावतीचं शूटिंग पूर्ण होत नाहीय, तोपर्यंत मी कुठेच लक्ष देणार नाही.'

पद्मावतीची कथा आणि संस्कृती चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी दीपिका सध्या राजस्थानच्या इतिहासाचा अभ्यास करतेय. त्यासाठी ती राजस्थानच्या इतिहासाचं पुस्तक सोबत ठेवते.  काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर दीपिकाला पाहिलं होतं. त्यावेळी तिच्या हातात पुस्तकं होती.

संजय लीला भंसाळीच्या पद्मावतीमध्ये दीपिका राणी पद्मिनीच्या भूमिकेत आहे. तिच्यासोबत रणवीर सिंग आणि शाहीद कपूर यांच्याही भूमिका आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 28, 2017 06:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close