दीपिकाच्या 'इन्स्टा फॉलोवर्स'ची संख्या दोन कोटी

या सर्वाधिक फॉलोर्वसची संख्या लक्षात घेता खुद्द इन्स्टाग्रामने दीपिकाला सन्मानित केलंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 1, 2017 01:39 PM IST

दीपिकाच्या 'इन्स्टा फॉलोवर्स'ची संख्या दोन कोटी

01 डिसेंबर : अभिनेत्री दीपिका पदुकोण नेहमीच तिच्या अभिनयातून चाहत्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करत असते. आणि याचीच दीपिकाला आता पोचपावती मिळालीये. दीपिकाच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोवर्सची संख्या दोन कोटींच्या घरात पोहचलीये.

या सर्वाधिक फॉलोर्वसची संख्या लक्षात घेता खुद्द इन्स्टाग्रामने दीपिकाला सन्मानित केलंय. दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक खास फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. या प्रेमाबद्दल तिने आपल्या चाहत्यांचे आभारही मानले.

'पद्मावती'मुळे दीपिकाला धमक्या येतात. पण तिच्या फॅन्सनी काही तिची साथ सोडली नाही. उलट त्यात वाढ झालीय.

Loading...

Was so excited to receive this today!This milestone will always be special!Thank you @instagram 🌟

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2017 01:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...