'पद्मावती'साठी दीपिकानं परिधान केला 93 किलोंचा पेहराव

सिनेमात दीपिकाचा दुपट्टा आहे 4 किलोंचा, तर घागरा आहे 20 किलोंचा. इतक्या वजनदार पोशाखात तिनं शूट केलं. याशिवाय तिचा मेकअपही एकदम हेवी होता. आणि जवळ जवळ 11 किलो वजनाचे दागिने तिला घालायला लागलेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2017 01:24 PM IST

'पद्मावती'साठी दीपिकानं परिधान केला 93 किलोंचा पेहराव

16 आॅक्टोबर : संजय लीला भंसाळीच्या 'पद्मावती'साठी दीपिकाला बरेच कष्ट करावे लागलेत. बरीच आव्हानं तिनं पेललीयत. तिच्या लूक्सचं सगळीकडे कौतुक होतंय, पण तिचा काॅस्च्युमच आहे 35 किलोंचा.

सिनेमात दीपिकाचा दुपट्टा आहे 4 किलोंचा, तर घागरा आहे 20 किलोंचा. इतक्या वजनदार पोशाखात तिनं शूट केलं. याशिवाय तिचा मेकअपही एकदम हेवी होता. आणि जवळ जवळ 11 किलो वजनाचे दागिने तिला घालायला लागलेत.

पूर्ण तयार झाल्यानंतर दीपिकाचं वजन 58 किलोंवरून पोचलं 93 किलोंवर.

संजय लीला भंसाळीनं पद्मावतीसाठी 400 किलोंचं सोनं वापरलंय. ते सोनं वितळवून पुन्हा नव्यानं डिझाईन केलं. त्यासाठी 200 कामगारांनी मिळून काम केलं. त्यालाही 600 दिवस लागले.

Loading...

संजय लीला भंसाळीसाठी हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. हा सिनेमा या वर्षीचा सर्वात हिट ठरण्याची शक्यता आहे. सिनेमा 1 डिसेंबरला रिलीज होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2017 01:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...