अखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा!

अखेर दीपिका-रणवीरचं शुभमंगल, कोकणी पद्धतीनं झाला लग्नसोहळा!

सनई चौघडे वाजले. दीपिका-रणवीरच्या डोक्यावर अक्षता पडल्या. आज दीपिकाचं कोकणी पद्धतीनं लग्न झालं.

  • Share this:

मुंबई, 14 नोव्हेंबर : सनई चौघडे वाजले. दीपिका-रणवीरच्या डोक्यावर अक्षता पडल्या. आज दीपिकाचं कोकणी पद्धतीनं लग्न झालं. हे लग्न दोन पद्धतीनं होणार होतंच. पहिल्या दिवशी कोकणी पद्धतीनं आणि दुसऱ्या दिवशी सिंधी पद्धतीनं. रणवीर सिंग हा सिंधी आहे.त्यामुळे उद्या पुन्हा लग्नविधी त्याच्या पद्धतीनं होणार आहे.

काल ( 13 नोव्हेंबर ) रात्री संगीत सोहळा पार पडला. त्यावेळी रणवीर आणि दीपिकानं जोरदार डान्स केलाय. आता सगळे वाट पाहतायत ते  या डान्स व्हिडिओची. तो अजून बाहेर आलेला नाही. यावेळी कुटुंबातले लोक, मित्रमंडळी यांनी अक्षरश: जल्लोष केल्याची माहितीही समोर आलीय.

लग्नाच्या वेळी बाॅलिवूडचं कुणी उपस्थित नाहीय. म्हणजे दीपिका-रणवीर सोडून. लग्नासाठी फक्त घरातले आणि जवळचे फ्रेंड्स आहेत. सोमवारी रणवीर-दीपिकानं एकमेकांना अंगठीही घातली आणि औपचारिक साखरपुडा केला.

दीपिकाची मूनसाईन कर्क आहे. त्यामुळे ती खूप हळवी आहे. मध्यंतरी रणबीर कपूरशी ब्रेकअप झाल्यावर ती डिप्रेशनमध्ये गेली होती, ती याच हळवेपणामुळे. रणवीरची मूनसाईन मीन आहे. त्यामुळे तोही संवेदनशील आहे. या दोन राशींचं एकमेकांशी चांगलं जमतं. त्यामुळे दीपिका-रणवीर एकमेकांच्या सहवासात आनंदी असतात.

दीपिकाची मेहंदी काढायला दीप्ती बेन मारू या मेहंदी आर्टिस्टला इटलीला बोलावून घेतलं. दीप्ती मुंबईच्या नालासोपारा इथे राहते. 11 नोव्हेंबरला ती इटलीला पोचली.

दीप्तीनं फक्त दीपिकाला नाही तर रणवीरलाही मेहंदी लावलीय. आता अनुष्का-विराटप्रमाणे दीपवीर आपले फोटोज कधी ट्विट करतायत, याची सगळे जण वाट पहातायत.

दीपिकानं मेहंदी आर्टिस्टसमोर ठेवल्या इतक्या अटी

First Published: Nov 14, 2018 06:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading