मुंबई, 29 आॅक्टोबर : सध्या बाॅलिवूडमध्ये चर्चा आहे दोन मोठ्या लग्नांची. दीपिका-रणवीरचं आणि प्रियांका-निकचं. आता दीपिकाच्या लग्नाचं रिसेप्शन आणि प्रियांकांच्या लग्नाची तारीख एकाच दिवशी आहे, मग कोण कुठे हजेरी लावणार, अशीही चर्चा सुरू झाली होती.
पण आता नवीन बातमी आलीय. या मेगा इव्हेंटची टक्कर होणार नाहीय. दीपिका-रणवीरचं लग्न 14 आणि 15 नोव्हेंबरला होणार आहे. त्यांचं एक रिसेप्शन बंगळुरूला आहे, तर मुंबईतलं रिसेप्शन 28 नोव्हेंबरला आहे. त्यांनी रिसेप्शनची तारीख बदलली.
प्रियांकाचं लग्न 2 डिसेंबरला आहे. मेहंदी आणि संगीत 30 नोव्हेंबरपासून सुरू असेल. आधी संदीप खोसला आणि अबू जानी प्रियांकासाठी ड्रेस डिझाईन करणार अशी बातमी होती. आता त्यात सब्यासाचीचंही नाव जोडलं गेलंय.
स्पाॅटबाॅयच्या माहितीनुसार संदीप आणि अबू जानी लग्नाच्या संगीताचा लेहंगा डिझाइन करणार आहेत, तर सब्यासाची लग्नाचा लेहंगा डिझाइन करेल. प्रियांका अमेरिकेला जाण्याआधी सब्यासाचीला भेटली होती.
हा लग्नसोहळा 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरदरम्यान पार पडणार आहे.जोधपूर इथं दोघांनीही जाऊन हे लग्नस्थळ निश्चित केलंय. लग्नाला फक्त 200 जण उपस्थित असतील. अगदी जवळचे मित्र,मैत्रिणी,नातलग या लग्नाचे साक्षीदार होतील.
18 ऑगस्टला या दोघांचा साखरपुडा संपन्न झाला होता. निक आणि प्रियांका यांच्यात 10 वर्षांचं अंतर आहे. निकला खरं तर प्रियांका मोठी असल्याने तिचा समजुतदारपणा जास्त आवडतो. तर प्रियांकालाही निकमध्ये तिला हवा तसा जोडीदार दिसलाय असं म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे इन्टाग्राम अकाऊंटवरूनही प्रियांकाच्या फोटोंवर कमेंट्स करत निकने त्याच्या प्रेमाचा इजहार करून टाकला होता.
Big Boss 12 : शेवटी अनुप जलोटा-जसलीनच्या नात्यातलं सत्य बाहेर आलंच
अनिकेत विश्वासराव- प्रियदर्शन जाधव करायला येतायत धमाल
मध्यंतरी, एका मुलाखतीत दीपिकाला विचारलं होतं. रणवीरचं पहिलं इम्प्रेशन कसं होतं? या प्रश्नावर दीपिका म्हणाली, ' त्याचा बँड बाजा बारात सिनेमा मी पाहिला होता. त्यावेळी माझा एजंट म्हणाला हा मोठा स्टार बनेल. पण मीच म्हटलं, मला नाही असं वाटत.'
एवढंच नाही, तर दीपिकानं सांगितलं, रणवीर तिच्या टाइपचा नाही. पण त्याचा अभिनय पाहून मी प्रभावित झालीय. त्यानं दिल्लीच्या मुलाचा अभिनय इतका तंतोतंत केला की मला माहीतच नव्हतं तो मुंबईचा आहे म्हणून.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा