मुंबई, 29 डिसेंबर : दीपिका आणि रणवीर सिंग बाॅलिवूडचे बेस्ट कपल समजले जातायत. दोघंही सदा हसमुख आणि फ्रेंडली आहेत. सेलिब्रिटींच्या लग्नाला तर ते हजेरी लावतात. पण आपल्या मित्रमैत्रिणींच्या लग्नातही ते उपस्थित असतात.
नुकतेच ते एका फ्रेंडच्या लग्नाला गेले होते. तिथे दीपवीरनी डान्स केला. तो व्हिडिओ व्हायरल झालाय. तिथे आलेल्या पाहुण्यांबरोबर त्यांनी फोटोही काढला.दोघांनी खूप धमाल केली.
सिंबा रिलीज झाला. पहिल्याच दिवशी सिनेमानं 23 कोटींचा व्यवसाय केला. दीपिका आता मेघना गुलजारचा छप्पाक सिनेमा करणार आहे. त्यात ती सध्या बिझी आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा