ड्रग्ज प्रकरणी दीपिका पादुकोणच्या मॅनेजरच्या अडचणीत वाढ; आता संपूर्ण टीमच NCB च्या निशाण्यावर

घरात ड्रग्ज (drugs) सापडल्यानंतर दीपिका पादुकोणची (deepika padukone) मॅनेजर करिश्मा प्रकाश (karishma prakash) गायब आहे, पण तिनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. आता NCB ने सखोल तपास सुरू केला आहे.

घरात ड्रग्ज (drugs) सापडल्यानंतर दीपिका पादुकोणची (deepika padukone) मॅनेजर करिश्मा प्रकाश (karishma prakash) गायब आहे, पण तिनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. आता NCB ने सखोल तपास सुरू केला आहे.

  • Share this:
    मुंबई, 02 नोव्हेंबर : अभिनेत्री दीपिका पादुकोणची (Deepika Padukone) मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या (Karishma Prakash) घरात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (Narcotics Control Bureau) ड्रग्ज सापडल्यापासून करिश्मा गायब आहे. मात्र तिनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. यानंतर एनसीबीने (NCB)  तिच्या संपूर्ण टीमलाच लक्ष्य केलं आहे. करिश्माच्या टीमलाही एनसीबीने समन्स बजावला आहे. क्वान (KWAN) कंपनीतील तिच्या सहकाऱ्यांना एनसीबीने समन्स जारी केला आहे. KWAN ही सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनी आहे. याच कंपनीमार्फत करिश्मा प्रकाश दीपिकाची मॅनेजर आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगलचा तपास करताना एनसीबीला दीपिका आणि करीश्माचे ड्रग्ज चॅट सापडले होते. त्यावेळी दोघींचीही स्वतंत्र आणि समोरासमोरही चौकशी झाली होती. दरम्यान रिया चक्रवर्ती प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलर्सच्या चौकशीतही करिश्माचं नाव समोर आलं. करिश्मा या ड्रग्ज पेडलर्सच्या संपर्कात सातत्याने होती, अशी माहिती मिळाली. 4 दिवसांपूर्वीच करीश्माच्या घरावर एनसीबीने धाड टाकली. मात्र त्यावेळी ती घरात नव्हती. तिच्या घरात ड्रग्जही सापडले.  तिला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आला. मात्र तिनं त्याला उत्तर दिलं नाही. ती गायब आहे आणि फोनही स्विच ऑफ आहे. त्यामुळे तिच्या टीमला आता चौकशीसाठी बोलावलं आहे. हे वाचा -  "माझ्याइतका महिलांचा सन्मान कुणीच करत नसावा", मुकेश खन्ना यांचं स्पष्टीकरण एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करिश्मा प्रकाशशी संपर्क होत नाही आहे आणि तिनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. एनडीपीएस (NDPS) कोर्टासमोर तिच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. पण करिश्मा आम्हाला चौकशीसाठी सहकार्य करत नाही आहे, त्यामुळे आम्ही तिच्या या जामिनाला विरोध करणार आहोत. असं एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी CNN-NEWS18 शी बोलताना सांगितलं. याआधी बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने केलेल्या तपासात दीपिका आणि करिश्माचे 2017 सालचं ड्रग्जसंबंधी चॅट समोर आलं होतं. या चॅटमध्ये तिनं आपली मॅनेजर करिश्माकडे ‘माल’ आहे का अशी विचारणा केली होती. त्यानंतर या दोघांचीही चौकशी करण्यात आली होती. शिवाय दीपिका आणि करिश्मा या दोघींना समोरासमोरही आणून त्यांची चौकशी झाली. हे वाचा - कंगनाला आली मुंबईची आठवण; म्हणे, “या गोष्टी मिस करतेय” दीपिका सध्या गोव्यात शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ड्रग्ज प्रकरणात नाव येताच दीपिकाला शूटिंग अर्धवट सोडून मुंबईला यावं लागलं होतं. दीपिकाची अनेक तास चौकशी करण्यात आली होती. मी सुद्धा या चॅटचा एक भाग आहे हे दीपिकाने कबूल केलं होतं. या चौकशीनंतर दीपिकाचा फोनही जप्त करण्यात आला होता. चौकशीनंतर दीपिका पुन्हा गोव्याला गेली. आता दीपिकाच्या मॅनेजरच्या घरात ड्रग्ज सापडल्यानंतर या प्रकरणात आता आणखीन धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
    Published by:Priya Lad
    First published: