जेव्हा चाहतीच्या स्टाइल स्टेटमेन्टसमोर फिकं पडतं दीपिकाचं सौंदर्य

जेव्हा चाहतीच्या स्टाइल स्टेटमेन्टसमोर फिकं पडतं दीपिकाचं सौंदर्य

त्या दोघींमध्ये नक्की अभिनेत्री कोण आहे असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे.

  • Share this:

मुंबई. 26 ऑगस्ट- बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अशी दीपिका पदुकोणची ओळख आहे. फक्त अभिनयातच नाही तर फॅशन सेन्समध्येही ती अनेक अभिनेत्रींच्या वरचढ आहे. नुकतच दीपिकाला लंडनच्या रस्त्यावर बिंधास्तपणे फिरताना पाहण्यात आलं. यावेळी तिच्यासोबत अनेक चाहत्यांनी फोटो काढले. चाहत्यांसोबतचे तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण त्यातही एका चाहतीसोबत काढलेल्या फोटोवर अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत.

त्या दोघींमध्ये नक्की अभिनेत्री कोण आहे असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. दीपिकापेक्षा चाहतीचे कपडे जास्त स्टायलिश असल्याचं अनेकांनी कमेंटमध्ये लिहिलं तर दीपिकापेक्षा जास्त सुंदर तर चाहतीच दिसत असल्याचं एका युझरने लिहिलं. या फोटोमध्ये दीपिकाने मस्टर्ड रंगाची कार्गो पॅन्ट घातली आहे. यावर तिचे काळ्या रंगाचे ग्लेअर फार सुंदर दिसत आहेत. दीपिकाच्या चाहतीबद्दल सांगायचे झाले तर, तिने करड्या रंगाच्या पॅन्टवर पांढऱ्या रंगाचा टॉप घातला होता आणि त्यावर काळ्या रंगाचं जॅकेट घातलं होतं.

 

View this post on Instagram

 

London Vibes #DeepikaPadukone snapped with a fan #photooftheday #pictureperfect #Instalove #instadaily #saturday #love

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

दीपिकाच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर लवकरच ती 'छपाक' आणि '83' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'छपाक' सिनेमात ती अ‍ॅसिड अटॅक सव्हायवर लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारणार आहे. '83' सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसेल. तर दीपिका या सिनेमात त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसेल. लग्नानंतर रणवीर- दीपिकाचा हा पहिला एकत्र सिनेमा असणार आहे. याआधी दोघांनी संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत', 'बाजीराव मस्तानी' आणि 'रामलीला' या सिनेमांत एकत्र काम केलं होतं.

सोनम कपूरला व्हिगन होणं नडलं, इन्स्टाग्रामवर स्वतःहून दिली माहिती

बॉलिवूडच्या एक पाऊल पुढेच अल्लू अर्जुन, त्याच्या रेंज रोवरची किंमत एकदा वाचाच!

VIDEO: हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले; तापी नदीजवळील गावांना सतर्कतेचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 12:37 PM IST

ताज्या बातम्या