दीपिका सांगणार द्रौपदीच्या नजरेतून महाभारत, पुरुष पात्रांबद्दल म्हणाली...

दीपिकानं याआधी मस्तानी आणि राणी पद्मावती यांच्या चरित्रात्मक भूमिका साकारल्या होत्या आणि त्यासाठी तिचं खूप कौतुकही केलं गेलं.

News18 Lokmat | Updated On: Oct 25, 2019 12:24 PM IST

दीपिका सांगणार द्रौपदीच्या नजरेतून महाभारत, पुरुष पात्रांबद्दल म्हणाली...

मुंबई, 25 ऑक्टोबर : दिवाळीनिमित्त एका मागोमाग एक बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून कोट्यवधींचा गल्ला बॉक्स ऑफिसवर जमत आहे. आता आणखी एक बहुप्रतीक्षित 'महाभारत' सिनेमा तयार होणार असून त्यात द्रौपदीची भूमिका दीपिका पदुकोण साकारणार आहे. आतापर्यंत दीपिकाने वेगवेगळ्या चरित्र भूमिका केल्या आहेत. महाभारतातील द्रौपदी पडद्यावर साकरण्यासाठी ती आता तयार आहे. महाभारताची पौराणिक कथा द्रौपदीच्या नजरेतून दाखवण्यात येणार आहे.

महाभारत नेहमीच लोकांमध्ये आवडीचा विषय राहिला आहे. आतापर्यंत यावर मालिका आणि चित्रपटही काढण्यात आले. यातील प्रत्येक पात्रावर वेगवेगळ्या मालिका निघाल्या आहेत. मात्र, द्रौपदीच्या नजरेतून महाभारत या चित्रपटातून दाखवले जाईल.

सोनाक्षी सिन्हानं चोरला मलायका अरोराचा ड्रेस, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

Loading...

 

View this post on Instagram

 

celebrating her grace,strength & courage... #3YearsOfMastani

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिकाने तिच्या भूमिकेबद्दल सांगितलं की, मी द्रौपदीची भूमिका करणं माझ्यासाठी आव्हान असेल तसेच ती माझ्यासाठी गौरवास्पद बाब आहे. महाभारताला पौराणिक कथा आणि सांस्कृतिक प्रभावासाठी ओळखलं जातं पण जीवनात अनेक धडे महाभारतातून मिळतात. सर्वाधिक धडे पुरुष पात्रांमधून मिळतात. यासाठी नव्या दृष्टीकोनातून ते समजून घेण्याची फक्त उत्सुकता नव्हे तर ते महत्वाचंही असेलं.

आर्चीच्या प्रेमातला गावरान परश्या बदलला, मेकओव्हरनंतरचा नवा लुक पाहिला का?

महाभारत हे एका भागात सांगता येणार नाही. त्याचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक भाग होतील. यातील पहिला भाग 2021 मध्ये प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे. चित्रपट निर्माता मधु मंटेनासोबत दिपिका सहनिर्माती असेल. चरित्रात्मक भूमिका साकारण्याची दीपिकाची ही पहिलीच वेळ नाही. यााधीही तिनं, मस्तानी आणि राणी पद्मावती यांच्या भूमिका साकारल्या होत्या आणि त्यासाठी तिचं खूप कौतुकही केलं गेलं. आज दीपिका बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

चित्रपट निर्माते मंटेना म्हणतात की, महाभारतासारखं काव्य द्रौपदीच्या नजरेतून मोठ्या पडद्यावरून पुन्हा सांगणे मोठी जबाबदारी आहे. जवळपास प्रत्येकाला महाभारताची ओळख आहे. पण आमच्या चित्रपटातून एक वेगळा दृष्टीकोन प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न असेल.

साधी गोष्ट कळत नाही! Dabangg 3 च्या ट्रेलरमध्ये मोठी चूक

पौराणिक कथांमधील नायिका असलेल्या द्रौपदीची भूमिका दिपिका निभावू शकते. ती जर या चित्रपटात नसती तर हा प्रकल्प इतक्या उत्सुकतेनं झाला नसता. लवकरच चित्रपटाशी संबंधित इतर क्रिएटीव्ह टीमची माहिती सांगितली जाईल असही चित्रपट निर्मात्यांनी म्हटलंय.

=======================================================

VIDEO : 'कन्येचा पराभव शिवसेनेला राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्यामुळे', खडसेंचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2019 12:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...