मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Deepika Padukone ने खास कारणासाठी 'तमाशा'मध्ये घातलं होतं लाल स्वेटर; कारण वाचून वाटेल आश्चर्य

Deepika Padukone ने खास कारणासाठी 'तमाशा'मध्ये घातलं होतं लाल स्वेटर; कारण वाचून वाटेल आश्चर्य

 बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या   (Deepika Padukone)  चाहत्यांनी तिचा 'तमाशा' (Tamasha)   चित्रपट नक्कीच पाहिला असेल. तुम्ही पाहिलं नसलं तरी चित्रपटातील गाणी नक्कीच कधीतरी ऐकली असतील किंवा गुणगुणली असतील.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या   (Deepika Padukone)  चाहत्यांनी तिचा 'तमाशा' (Tamasha)   चित्रपट नक्कीच पाहिला असेल. तुम्ही पाहिलं नसलं तरी चित्रपटातील गाणी नक्कीच कधीतरी ऐकली असतील किंवा गुणगुणली असतील. हा चित्रपट बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी बनवला होता. जे त्यांच्या चित्रपटांमधील छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देतात. या चित्रपटाच्या रिलीजच्या वेळी त्यातील ब्रेकअप सॉन्ग 'अगर तुम साथ हो'  (Agar Tum Sath Ho)  तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध झाले होते.

" isDesktop="true" id="635838" >

सुरुवातीला दीपिका आणि रणबीर कपूरच्या या चित्रपटानं फारसं लक्ष वेधलं नाही. पण हळूहळू या चित्रपटाने गाणी आणि कथेच्या जोरावर लोकांच्या मनात घर केलं होतं. हे इम्तियाज अलीच्या चित्रपटांचे सौंदर्य आहे. या चित्रपटाशी संबंधित अनेक रहस्ये आहेत. जी आजही अनेकांना माहीती नाहीत.

'तमाशा' चित्रपटातही इम्तियाजने छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले होते. 'अगर तुम साथ हो' हे गाणे प्रेक्षकांना खूप आवडले होते. परंतु या गाण्यात कलाकारांनी घातलेला पेहराव मानवी मन आणि हृदयाचे प्रतीक आहे हे फार कमी लोकांच्या लक्षात आले. चित्रपटांचे काही वेडे होते ज्यांनी हा तपशील पकडला होता. एका नेटिझनने रणबीर-दीपिका पदुकोणच्या ड्रेसच्या रंगांची मन आणि हृदयाशी तुलना केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका यूट्यूब यूजरने कमेंट करत म्हटलं होतं की, 'जर तुम्ही नीट पाहिलत तर तुम्हाला कळेल की रणबीरच्या ड्रेसचा रंग डोक्याच्या (बुद्धी) रंगाचा आहे. तर दीपिकाने हृदयाच्या रंगाचा ड्रेस घातला आहे.

(हे वाचा:Stop It डॅड' फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL )

यानंतर इम्तियाज अलीने युजरचा मुद्दा बरोबर सांगितला आहे असं सांगितलं होतं. चित्रपटातील तारा आणि वेद या पात्रांसाठी ड्रेस निवडताना त्याने आपली विचारसरणी सांगितली होती. या गाण्याच्या निमित्ताने डोक्याचा आणि मनाचा संघर्ष दिग्दर्शकाने सुंदरपणे चित्रित केला आहे.हा चित्रपट २०१५ मध्ये रिलीज झाला होता. हा एक रोमँटिक,कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. चित्रपटातील दीपिका आणि रणबीरच्या केमेस्ट्रीने पुन्हा एकदा चाहत्यांना इमोशनल केलं होतं.

First published:

Tags: Deepika padukone, Entertainment