News18 Lokmat

जेव्हा दीपिकाच्या पुतळ्यालाच कीस करायला लागला रणवीर सिंग

दीपवीर जेव्हाही एकत्र येतात तेव्हा त्यांचे चाहते फार खूश होतात. या व्हिडिओ बाबतीतही काहीसे असेच झाले.

News18 Lokmat | Updated On: Mar 15, 2019 06:25 AM IST

जेव्हा दीपिकाच्या पुतळ्यालाच कीस करायला लागला रणवीर सिंग

लंडन, 15 मार्च - लंडनमधील मदाम तुसाँ संग्रहालयात गुरुवारी दीपिका पदुकोण तिच्या वॅक्स स्टॅच्यूच्या अनावरण सोहळ्याला गेली होती. यावेळी तिचं संपूर्ण कुटुंबही तिच्यासोबत उपस्थित होतं. सगळ्यांनी दीपिकाच्या मेणाच्या पुतळ्यासोबत पोझ दिले आणि फोटोही काढले. पण, रणवीर सिंगने जेव्हा दीपिकाचा हा स्टॅच्यू पाहिला तेव्हा तो काही क्षण पाहतच राहिला. एवढंच नाही तर स्टॅच्यूला किस करण्याच्या प्रयत्नात तो दिसला. रणवीरने हा स्टॅच्यू घरी घेऊन जाण्याची मागणी केली.
 

Loading...

View this post on Instagram
 

@mydeepveer “Yay Yay“ Deepika’s wax statue at #madametussauds in London ❤️ Follow ➡️ @myranveersingh for more updates @myranveersingh #myranveersingh @ranveersingh #ranveersingh ♥❤❣♡ ● ● ●_ ● ● { Follow for More ➡️ @myranveersingh } ✳️❇️✳️ ● ● ● ● ✨⭐️ ~♥~~♥~~♥~~♥~~♥~~♥~ ☺ . . [#zeecineawards #shahrukhkhan #shahidkapoor #akshaykumar #aishwaryarai #aliabhatt #varundhawan #sunnyleone #deepikapadukone #priyankachopra #kareenakapoor #sonamkapoor #salmankhan #katrinakaif #taapsee #shraddhakapoor #madhuridixitnene #kingkhan #bollywood #sonakshisinha #afghanistan #afghansong #bollywoodsongs #indian #arjunkapoor #nehakakkar #ozee ]


A post shared by RANVEER SINGH FAN CLUB (@myranveersingh) on

गुरुवारी दीपिकाचं संपूर्ण कुटुंब मदाम तुसाँ संग्रहालयात तिच्या पुतळ्याचं अनावरण करायला गेले. दीपिकाने याचा व्हिडीओही शूट केला. व्हिडीओमध्ये रणवीर दीपिकाच्या या स्टॅच्यूला एकटक न्याहाळताना दिसत आहे. या पुतळ्याला किस करण्याचा प्रयत्न करतानाही तो दिसला. रणवीर हा स्टॅच्यू घरी न्यायची मागणी करतो तेव्हा दीपिका त्याला म्हणते की, जेव्हा तू ८३ सिनेमाच्या चित्रीकरणासाठी जेव्हा इथे येशील आणि तुला माझी आठवण येईल तेव्हा इथे येत जा. दीपवीरच्या चाहत्यांना हा व्हिडीओ फार आवडला.
 

View this post on Instagram
 

@deepikapadukone’s live video from Madame Tussads London wax statue unveiling. She surprised those fans


A post shared by Deepika Padukone’s Fanpage (@deepika.padukone.fanpage) on

दीपवीर जेव्हाही एकत्र येतात तेव्हा त्यांचे चाहते फार खूश होतात. या व्हिडीओ बाबतीतही काहीसे असेच झाले. दोघांच्याही फॅनपेजवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला. दोघांनी या कार्यक्रमाचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 06:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...