VIDEO : संगतीचा परिणाम! अतरंगी ड्रेसमुळे दीपिका पदुकोण झाली ट्रोल

VIDEO : संगतीचा परिणाम! अतरंगी ड्रेसमुळे दीपिका पदुकोण झाली ट्रोल

एअरपोर्ट लुकमुळे दीपिकाला ट्रोल केलं जात आहे. अनेकांनी दीपिकाच्या ड्रेसिंगसाठी रणवीरला जबाबदार धरलं आहे.

  • Share this:

मुंबई, 10 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आजकाल खूप चर्चेत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नॅशनल फिल्म अवॉर्डमध्ये तिच्या पद्मावत सिनमातील ‘घुमर’ गाण्याला बेस्ट कोरिओग्राफी अवॉर्ड मिळाला. हे गाणं दीपिकावर चित्रित झालं होतं. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या एकीकडे तिच्या या गाण्यची चर्चा सुरू असली तरीही दुसरीकडे तिच्या एअरपोर्ट लुकमुळे तिला ट्रोल सुद्धा केलं जात आहे.

सोशल मीडियावर दीपिका पदुकोणचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यात तिला लंडन एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी तिनं लॉन्ग कोट घातला असून तिचा हा व्हिडिओ पाहिल्यावर तिला ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे.

पावसाचा फटका मालिकांनाही! तरीही कलाकारांनी म्हटलं, शो मस्ट गो ऑन

 

View this post on Instagram

 

#deepikapadukone off to London #airportdiaries #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

एका युजरनं लिहिलं, दीपिकाच्या ड्रेसिंग सेन्सला नक्की झालंय तरी काय? असं वाटतंय की हा रणवीरच्या संगतीचा परिणाम आहे. तर दुसऱ्या एका युजरनं लिहलं, कदाचित प्रवासादरम्यान नॉर्मल कपडे घालण्यास परवानगी नाही आहे.

माझ्या नवऱ्याची बायको : अखेर राधिका सौमित्रला लग्नासाठी देते होकार पण...

सिनेमांबद्दल बोलायचं तर दीपिकाचा छपाक हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. हा सिनेमा दिल्लीतील अ‍ॅसिड हल्ला पीडीता लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. याशिवाय दीपिका ‘83’मध्ये रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारत आहे. कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका दीपिका साकारणार आहे.

VIDEO : मलायकाशी फ्लर्ट करणाऱ्या अभिनेत्यावर भडकला अर्जुन कपूर!

====================================================================

VIDEO : दीपाली सय्यदचं उपोषण सुरूच, मानसीला अश्रू अनावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2019 10:52 PM IST

ताज्या बातम्या