दीपिकानं सांगितलं ‘83’मध्ये रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारण्याचं कारण

दीपिकानं सांगितलं ‘83’मध्ये रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारण्याचं कारण

Deepika Padukone | Ranveer Singh | 83 Film | Chhapak | दीपिकानं या भूमिकेसाठी होकार दिल्यानंतर तिच्या या निर्णयावर वेगवेगळे तर्क लावले गेले.

  • Share this:

मुंबई, 29 जून : अभिनेता रणवीर सिंग ‘गली बॉय’च्या यशानंतर आता कपिल देव यांचा बायोपिक ‘83’ च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमात रणवीर कपिल देव यांची भूमिका साकरणार आहे. तर दीपिका या सिनेमात कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिकानं ही भूमिका साकारायला होकार दिला. त्यानंतर दीपिकाकडे अनेक चांगल्या भूमिका असताना तिनं ही छोटीशी भूमिका का स्वीकारली असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला गेला. त्यावर आता खुद्द दिपिकानंच तिची प्रतिक्रिया दिली आहे.

मलायकानं शेअर केला पोल डान्स पोजमधला फोटो, अर्जुननं कमेंटमध्ये केली ‘ही’ मागणी

 

View this post on Instagram

 

& on to the next...Thank You @kabirkhankk for this incredible honour...! #RomiDev #Day1 @83thefilm @ranveersingh

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिकानं या भूमिकेसाठी होकार दिल्यानंतर तिच्या या निर्णयावर अनेकांनी वेगवेगळे तर्क लावले. कोणी तिला मानधन जास्त मिळाल्याचं म्हटलं तर कोणी तिला फक्त रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारायची आहे असा अंदाज वर्तवला. मात्र ‘एशिअन एज’ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखातीत दीपिकानं यामागचं कारण स्पष्ट केलं.ती म्हणाली, 'रणवीर माझा पती आहे म्हणून मी ही भूमिका स्वीकारलेली नाही. यामागे खूप मोठं कारण आहे. ही भूमिका आणि माझ्या रिअल लाइफमधील अनुभव यात बरंच साम्य आहे. माझे वडील एक स्पोर्टपर्सन आहेत त्यामुळे या व्यक्तींच्या रिलेशिनशीप आणि आयुष्यात काय समस्या असतात हे मला चांगलं माहीत आहे. एका स्पोर्टपर्सनची पत्नी किंवा मुलगी असणं काय असतं याचा अनुभव मला आहे.'

अमिषा पटेलला कोर्टाचा समन्स, २.५ कोटी रुपयांची केली फसवणूक

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

या मुलाखतीत दीपिका म्हणाली, 'मी या सिनेमात कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. जी त्यांच्या या सर्व यशात त्यांची मदतनीस होती.विशेषतः ते कर्णधार असताना ती त्याच्या सपोर्ट सिस्टीमचा एक भाग होती आणि हे सर्व मी माझ्या खऱ्या आयुष्याशी अनुभवते. एका खेळडूसाठी त्याचं कुटुंब कशाप्रकारे आपल्या स्वप्नांचा त्याग करतं. हे मी खूप जवळून पाहिलं आहे. जेव्हा ती आपलं लक्ष्य गाठतात तेव्हा तेव्हा हा त्यागही संपतो आणि हे मला माझ्या कुटुंबातच पाहायला मिळालं. माझी आई नेहमीच बाबांच्या मागे खंबीरपणे उभी राहिलेली मी पाहिली आहे. त्यामुळेच मी या भूमिकेसाठी होकार दिला.'

VIDEO : रणवीर सिंगनं उठवला देशातल्या शिक्षण पद्धतीविरोधात आवाज

 

View this post on Instagram

 

& it’s a wrap on THE MOST PRECIOUS film of my career...see you all at the movies!🎬 10.1.2020 #Chhapaak

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

या सिनेमा व्यतिरिक्त दीपिका मेघना गुलजारच्या छपाक सिनेमातही दिसणार आहे. हा सिनेमा दिल्लीतील अ‍ॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. दीपिकानं काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं असून यात अभिनेता विक्रांत मेस्सी दीपिका सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा 10 जानेवारी 2020ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

==============================================================

SPECIAL REPORT : 'नासा' खरंच कृत्रिम ढगांची निर्मिती करणार?

First published: June 29, 2019, 12:02 PM IST

ताज्या बातम्या