Home /News /entertainment /

'कोरोनामुळे मला ओळखणं झालं होतं कठीण',दीपिका पादुकोणने शेअर केल्या त्या भयानक आठवणी

'कोरोनामुळे मला ओळखणं झालं होतं कठीण',दीपिका पादुकोणने शेअर केल्या त्या भयानक आठवणी

अभिनेत्री दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) आपल्या त्या कठीण काळाच्या आठवणी सांगितल्या आहेत, जेव्हा तिला कोरोनाची लागण झाली होती.

    मुंबई, 8 जानेवारी-   गेली दोन वर्षे कोरोनाने   (Coronavirus)   देशासह जगभरात हाहाकार माजवला आहे. सर्वसामान्यांसोबतच बॉलिवूडलाही   (Bollywood)  कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. एकापाठोपाठ एक बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण झालेलं दिसून येत आहे. दरम्यान अभिनेत्री दीपिका पादुकोणने   (Deepika Padukone)  आपल्या त्या कठीण काळाच्या आठवणी सांगितल्या आहेत, जेव्हा तिला कोरोनाची लागण झाली होती. अभिनेत्री दीपिका पादुकोणनला गेल्यावर्षी मे महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी ती आपल्या शहरात म्हणजेच बेंगलोरमध्ये होती. दीपिका पादुकोणला कोरोनाचा फटका बसला होता. दीपिकासोबतच तिच्या आई वडील आणि बहिणीला कोरोनाची लागण झाली होती. नुकताच कंपेनियनला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने आपल्या या दिवसांबद्दल सांगितलं आहे. हा काळ आपल्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फारच कठीण होता असं तिनं म्हटलं आहे. यावेळी मला ओळखणंसुद्धा कठीण होतं, असंही तिनं सांगितलं आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणने म्हटलं, 'कोरोना महामारीनं एक माणूस म्हणून आपल्याला पूर्णपणे बदलून टाकलं आहे. अभिनेत्री म्हणाली, लॉकडाऊनच्या पहिल्या वर्षी फारसा त्रास नव्हता झाला. त्यावेळी ती आपल्या पतीसोबत मुंबईमध्येच होती. परंतु दुसऱ्या वर्षी लॉकडाऊनमध्ये ती आपल्या आई वडिलांसोबत बेंगलोरमध्ये होती. यावेळी तिला व तिच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाच्या अनुभवाबद्दल बोलताना दीपिका म्हणाली, 'कोरोनाने मला पूर्णपणे बदललं. कोरोनाची लागण झाल्यानंतर मला शारीरिकदृष्ट्या ओळखणंही कठीण झालं होतं. मला असं वाटतं मला जे औषध देण्यात आलं होतं ते स्टेरॉईड होतं. त्यामुळे माझी अशी अवस्था झाली असावी. कोरोनाचा हा काळ खूपच विचित्र होता. यावेळी माझं मन एक विचार करत असे तर डोकं दुसरंच. मला वाटतं मला कोरोनाची लागण झाली होती तो काळ पण ठीक होता. परंतु त्यांनतर मला दोन महिन्यांची सुट्टी घ्यावी लागली. कारण ,आज डोकंच काम करत नव्हतं. हा काळ माझ्यासाठी फारच कठीण होता.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Coronavirus, Deepika padukone, Entertainment

    पुढील बातम्या