GMA 2019 मध्ये ग्रीन आउटफिटमध्ये दिसली दीपिका पदुकोण

GMA 2019 मध्ये ग्रीन आउटफिटमध्ये दिसली दीपिका पदुकोण

deepika padukone या अवॉर्ड शोमध्ये दीपिकासोबत अन्य बॉलिवूड स्टारही सहभागी झाले होते. अनन्या पांडे, जान्हवी कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, विकी कौशलसह अन्य सेलिब्रिटींनी आवर्जुन उपस्थिती लावली होती.

  • Share this:

मुंबई, 20 जून- दीपिका पदुकोण सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ एन्जॉय करत आहे. नुकतंच तिचं लग्न झालं आणि लवकरच ती पती रणवीर सिंगसोबत ८३ सिनेमात दिसणार आहे. सध्या ती न्यूयॉर्क आणि मुंबईमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये व्यग्र आहे. बुधवारी संध्याकाळी मुंबईत ग्राजिया मिलेनिअल अवॉर्ड्स २०१९ मध्ये ती सहभागी झाली होती. या कार्यक्रमाला तिने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला होता. अशी या फॅशन ब्रँडने हा गाउन डिझाइन केला आहे. दीपिकाने या सुंदर गाउनवर त्याच रंगाचे हिल्स आणि ज्वेलरी वापरली होती. लो पोनीटेलने तिच्या या लुकला वेगळाच टच दिला.

View this post on Instagram

#deepikapadukone 💚💚💚

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on


आपला हा लुक इन्स्टाग्रामवर शेअर करत दीपिकाने लिहिले की, ‘जागतिक पर्यावर दिवसासाठी थोडासा उशीरच झाला.’ तिच्या या फोटोवर दीपिकाचे चाहते भरभरून कमेंट करत आहेत. या अवॉर्ड शोमध्ये दीपिकासोबत अन्य बॉलिवूड स्टारही सहभागी झाले होते. अनन्या पांडे, जान्हवी कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, विकी कौशलसह अन्य सेलिब्रिटींनी आवर्जुन उपस्थिती लावली होती.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी दीपिका न्यूयॉर्कच्या द यूथ एंग्झायटी सेंटरला गेली होती. इथे तिची ओळख प्रसिद्ध मॉडेल केंडल जेनरशी झाली. दीपिकाने केंडलसोबत फोटो शेअर करत लिहिले की, ‘मला या सुंदर व्यक्तिला भेटायची संधी मिळाली. तुला जगातील सर्व सुख आणि मनःशांती मिळो अशी मी प्रार्थना करते.’

Loading...


याशिवाय दीपिकाने या कार्यक्रमाचे काही फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले होते. यात तिने मानसिक आजार हा आपल्या समाजासमोरील सर्वात मोठं आव्हान आहे आणि ती कशी यातून बाहेर आली धैर्य न हरण्याच्या तिच्या लढ्याबद्दल तिने मनमोकळेपणाने सांगितले.


VIDEO : सेटवर घुसून कलाकारांना रॉडने मारहाण, माही गिलला दुखापत


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2019 03:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...