मुंबई, 25 मे- बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या ( Deepika Padukone ) कान ( Cannes 2022 ) फिल्म फेस्टिवलमधील लुकची सध्या सगळीकडे चर्चा रंगलेली आहे. चाहत्ये तर नेहमीच दीपिकाच्या ड्रीम लुकची वाट पाहत असतात. कानच्या रेड कार्पेटवर दीपिकाचे विविध लुक पाहायला मिळाले. नुकतीच ती कानच्या रेड कार्पेटवर ऑरेंज कलरच्या गाउनमध्ये दिसली. मात्र ऑरेंज कलरच्या गाऊनमध्ये दीपिकाची चांगलीच तारांबळ उडाली. फॅशनसाठी कधीकधी रिस्क देखील घ्यावी लागते. असचं काहीसं दीपिकाच्या बाबतीत देखील झालं. मात्र ही रिस्क तिची चांगलीच फसली.
दीपिकाचा ड्रीमी लुक
दीपिकाने कानमध्ये रेड कार्पेटवर ऑरेंज कलरच्या गाउनमध्ये वॉक केला. तिचा हा गाऊन खूपच सुंदर आणि तितकाच स्टाईलिश होता. यावर दीपिकानं हिरव्या रंगाचे कानतले आणि ऑरेंज कलरची लिपस्टिक आणि फ्लॉलेस मेकअप, मैसी हेयरपन, ऑरेंज प्रिंटेड हील्ससोबत दीपिकानं Ashi Studio चा स्टनिंग गाउन घातला होता. ज्युरी मेंबर्ससोबत पोझ देताना दिसतेय. तिच्या या गाउनमुळं तिला साधे चार पाऊले देखील चालता येत नव्हतं. गाउन सांभळाताना तिला चांगलीच कसरत करावी लागत होती.
वाचा-लायगरच्या शूटिंग दरम्यान असं काय झालं की अनन्या पांडेला आवरलं नाही रडू?
चालत असताना दीपिकाच्या पायात सारखाच गाऊन अडकत होता. त्यामुळे तिची चांगलीच तारांबळ उडाली. जिना चडत असताना देखील तिला गाउन सांभाळताना नाकीनऊ आलं होतं. तिच्या चेहऱ्यार ती गाउनमुळे वैतगली आहे, असचं दिसत होते. सगळी पोझ देण्यात बिजी होती मात्र दीपिका आपली गाउन सांभळण्याच्या नादात होती.
दीपिकाची तारांबळ पाहून काहीनीं तिच्याबाबतीत साहनभूती दाखवली तर काहींनी तिला ट्रोल देखील केलं. तसेच काहींचे मत होते की, तिची हेल्पर कुठे आहे. ती का तिचा ड्रेस सांभाळताना दिसत नाही. दीपिका स्वत: च तिचा गाउन सांभाळताना दिसली. एका नेटकऱ्याने यावर कमेंट करत म्हटलं आहे की, म्हणून तर सगळे हासत आहेत. दीपिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.