हॉटेलमधून शॅम्पूच्या बाटल्या चोरायची दीपिका, बेस्ट फ्रेंडने सांगितलं गुपित

हॉटेलमधून शॅम्पूच्या बाटल्या चोरायची दीपिका, बेस्ट फ्रेंडने सांगितलं गुपित

दीपिकाच्या अधिकृत वेबसाइटवर तिची सर्वात जवळची मैत्रीण स्नेहा रामचंदरने एक नोट शेअर केली. यात तिने लोकांना दीपिकाबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी सांगितल्या.

  • Share this:

मुंबई, 3 ऑगस्ट- प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा मित्र असावा जो तुमच्या सुख दुःखात नेहमीच तुमची साथ देईल. जर तुमच्याकडेही असे मित्र- मैत्रिणी असतील तर तुम्हीही फार नशिबवान आहात. सर्वांसमोर तुम्हाला तोंडघशी पाडण्याचं काम मित्र करतात. याचा अनुभव नुकताच दीपिका पदुकोणने घेतला. दीपिकाच्या अधिकृत वेबसाइटवर तिची सर्वात जवळची मैत्रीण स्नेहा रामचंदरने एक नोट शेअर केली. यात तिने लोकांना दीपिकाबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी सांगितल्या.

स्नेहाने मेसेजमध्ये लिहिलं की, दीपिका तिच्या आयुष्यात सुखद आलिंगन आणि चॉकलेटच्या गरम कपासारखी आहे. तिने पुढे लिहिले की, ‘तुम्ही कोणा अशा व्यक्तिला ओळखता का ज्यांचं तुमच्या आयुष्यात असणं हे सुखद आलिंगन आणि चॉकलेटच्या गरम कपसारखं आहे? कोणी असं आहे का ज्यांच्याशी तुम्ही तासन् तास गप्पा मारू शकता आणि ज्यांच्यासोबत शांत बसूनही तुम्ही आनंदी राहता. कोणी असं आहे का ज्यांचे डोळे दयाळू आहेत. ज्यांच्याकडे पाहिल्यावर तुम्हाला वाटतं की त्यांना तुमची काळजी आहे.’

स्नेहाने पुढे दीपिकासोबतच्या 30 वर्ष जुन्या मैत्रीचा दाखला देत म्हटलं की, ‘कोणी असं ज्यांना प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने सजवून ठेवायची सवय असेल आणि त्यांच्या प्रत्येक आवडत्या गोष्टीवर लेबर- मेकर असतं. तुम्ही अशा व्यक्तिला ओळखता का की ते कुठेही फिरायला गेले तर तुमच्यासाठी हॉटेलमधल्या छोट्या छोट्या शॅम्पूच्या बाटल्या चोरून आणतात. म्हणजे गोळा करेल. कारण त्यांना माहीत आहे की तुम्हाला ते आवडतात? हो मला अशी व्यक्ती माहितीये.’

 

View this post on Instagram

 

❤️ #us

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

‘ती माझी मैत्रीण डीपी आहे. हा आमच्या सारख्या मित्र- मैत्रिणींसाठी आनंदाचा दिवस आहे. गेल्या 30 वर्षांपासून मी हे पाहत आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे.’ दीपिकाने यावर्षी तिच्या 33 व्या वर्षाच्या वाढदिवसाला अधिकृत वेबसाइट सुरू केली होती. दीपिकाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर मेघना गुलझार दिग्दर्शित छपाक सिनेमात ती दिसणार आहे. या सिनेमातून निर्मिती क्षेत्रातही ती पदार्पण करत आहे. याशिवाय कबीर खानच्या 83 सिनेमात ती रणवीर सिंगसोबत दिसणार आहे.

करण जोहरच्या 'ड्रग पार्टी'विरोधात आमदाराने लिहिलं Open Letter

बॉलिवूडच्या या 5 कपल्सनी सर्वांसमोर दिली होती नात्याची कबुली

Mission Mangal मराठीत रिलीज करण्यास मनसेचा विरोध, 'हे' आहे कारण

विद्या बालनच्या आयुष्यात नवी 'कहाणी' पाहा हा VIDEO

Published by: Madhura Nerurkar
First published: August 3, 2019, 1:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading